रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. वनडे विश्वचषक 2023 यंदा भारतात आयोजित केला गेला. भारतीय क्रिकेट संघाने मायदेशातील परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत विश्वचषकात सलग 9 सामने जिंकले आहेत. बुधवारी (15 नोव्हेंबर) उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर शुबमन गिल याची खास प्रतिक्रिया समोर येत आहे.
वनडे विश्वचषक 2023 (CWC 2023) चा हा पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. भारताने यात न्यूझीलंडला 70 धावांनी मात दिली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 4 विकेट्सच्या नुकसानावर 397 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ 48.5 षठकात 327 धावांवर सर्वबाद झाला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकांसह मोहम्मद शणी याच्या 7 विकेट्स भारताच्या विजयात महत्वाच्या ठरल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला या सामन्यात वेगवान सुरुवात मिळवून दिली होती.
रोहितसोबतच्या भागीदारीविषयी प्रश्न विचारल्यानंतर शुबमन गिलने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. गिल म्हणाला, “रोहितची प्रत्येक गोष्ट मझ्यावर प्रभाव टाकणारी असते. भागीदारीविषयी बोलायचं तर त्यांच्यासोबत खेळताना मला नॉन स्ट्राईकवर उभं राहावं लागतं. जे काही करायचे ते रोहित भाई स्वतःच करतो. पहिल्या 10 षटकांमध्ये तो फक्त चौकार आणि षटकार मारत असतो.” या प्रश्नाचे उत्तर देताना गिलच्या चेहऱ्यावर हसू पाहयला मिळाले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Shubman Gill – honestly, I just have to stand at the non striker’s end, Rohit Sharma bhai does everything. he will hit 4 or 6 everytime in first 10 overs (laughs).#INDvsNZ | #RohitSharma???? | #Hitmanpic.twitter.com/8XCrpSsc5k
— Immy|| ???????? (@TotallyImro45) November 15, 2023
दरम्यान, भारताने हा सामना मोठ्या अंतराने जिंकला असला, तरी न्यूझीलंडने कडवे आव्हान दिले, हे नाकारता येणार नाही. केन विलियम्सन आणि डॅरिल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 149 चेंडूत 181 धावांची भागीदारी केली. विलियम्सन वैयक्तिक 69, तर मिचेल 134 धावा करून बाद झाले. भारतासाठी शमीव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (Shubman Gill’s reaction on partnership with Rohit Sharma)
महत्वाच्या बातम्या –
पूर्ण फिट नसतानाही Semi Final 2 खेळला बवुमा! खातेही न खोलता परतला तंबूत
World Cup 2023 Semi Final: रिटायर्ड हर्ट होण्याच्या निर्णयाविषयी गिलकडून मोठा खुलासा, म्हणाला, ‘मला आधी…’