भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही देशांमध्ये झालेली पाच सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रोमांचक आणि लक्षात राहणारी ठरली. ही मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. दोन्ही संघांनी प्रत्येक सामन्यात विजयासाठी सर्वस्व पणाला लावले. ओव्हल कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर जवळपास हरलेला सामना जिंकून दाखवला. इंग्लंडला सामना आणि मालिका जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज होती, पण भारताने त्यांना पराभूत केलं.
या मालिकेत अनेक मोठे विक्रम झाले. कर्णधार म्हणून शुबमन गिलची (Shubman gill) ही पहिली कसोटी मालिका होती आणि त्यानेच जबरदस्त फलंदाजी केली. गिलने 5 सामन्यांत 10 डावांमध्ये सरासरी 75 ने खेळत एकूण 754 धावा ठोकल्या. एका कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरण्याचा मान त्याने पटकावला. त्याने सुनील गावस्करचा (Sunil Gavaskar) जुना विक्रम मोडीत काढला.
तसेच, रविंद्र जडेजानेही (Ravindra Jadeja) इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज म्हणून विक्रम केला. जड्डूने या मालिकेत तब्बल 6 वेळा अर्धशतक झळकावलं.






