इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या धरूण अय्यास्वामीने ४००मीटर अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले आहे. यावेळी त्याने ४८.९६ सेंकदात शर्यत पूर्ण करून वैयक्तिक राष्ट्रीय विक्रम मोडला.
याआधी अय्यास्वामीचा राष्ट्रीय विक्रम ४९.४५ असा होता. त्याने हा विक्रम मार्चमध्ये झालेल्या फेडरेशन कपमध्ये केला होता.
या २१ वर्षीय अॅथलेटिक्सने वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत अखेरच्या १०० मीटरमध्ये दोन जणांना मागे टाकत हे पदक जिंकले आहे. तर कतारच्या अबदेरहमान सांबाने सुवर्ण पदक मिळवले.
अय्यास्वामीचे हे भारतासाठीचे पुरूषांच्या ४०० मी अडथळ्याच्या शर्यतीमधील पहिले रौप्यपदक ठरले आहे. तर २०१०मध्ये जोसेफ अब्राहमने सुवर्ण पदक पटकावले होते.
या स्पर्धेतील भारताचे अय्यास्वामीने जिंकलेले अॅथलेटिक्समधील चौथे रौप्यपदक ठरले आहे. तसेच भारताने एकूण ४१ पदके जिंकली असून त्यात ८ सुवर्ण, १३ रौप्य आणि २० कांस्य पदकांचा समावेश आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघ उंपात्य फेरीत दाखल; कर्णधार राणी रामपालची हॅट्रिक
–एशियन गेम्स: सायना नेहवालचे हे पदक का आहे भारतासाठी खास?
–पीव्ही सिंधूने एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रचला इतिहास