---Advertisement---

अभिनेता सिद्धार्थच्या मृत्यूनंतर धोनीबद्दलच्या ‘त्या’ ट्वीटची रंगली चर्चा, पाहा नक्की काय होतं त्यात?

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 2:54 PM
---Advertisement---

सिनेविश्वातून गुरुवारी (०२ सप्टेंबर) एक काळीज तोडणारी बातमी पुढे आली आहे. ‘बिग बॉस’ फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या अकाली जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अगदी आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंनीही त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सिद्धार्थला क्रिडा क्षेत्रातही तितकाच रस होता. त्याने टोकियो ऑलिंपिक आणि टोकियो पॅरालिंपिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यातही क्रिकेट या खेळासंबंधी त्याला विशेष ओढ होती.

फार क्वचित लोकांना माहिती असेल, पण सिद्धार्थ हा माजी भारतीय कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी याचा मोठा चाहता होता. गतवर्षी जेव्हा धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली; तेव्हा सिद्धार्थनेही ट्वीट करत त्याला दैदिप्यमान कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता सिद्धार्थच्या जाण्यानंतर त्याचे ते जुने ट्वीट व्हायरल होत आहे.

धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. त्यानंतर क्रिकेटपटूंसह मोठमोठ्या अभिनेत्यांनीही त्याच्याबद्दल ट्वीट केले होते. सिद्धार्थनेही आपल्या आवडत्या क्रिकेटपटूच्या निवृत्तीनंतर ट्वीट करत लिहिले होते की, ‘क्रिकेटविश्वात खूप खेळाडू आणि कर्णधार आहेत, पण धोनी मात्र एकटाच आहे. त्याच्यासारखा दुसरा क्रिकेटपटू कोणीही नसेल. त्याने नेहमी पुढाकार घेत संघाचे नेतृत्त्व केले आहे. तो नेहमी संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळला आहे आणि भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये तुझी उणीव नेहमीच जाणवेल.’

दिवंगत अभिनेता सिद्धार्थच्या या ट्वीटने त्यावेळी अनेकांची मने जिंकली होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर धोनीप्रेमींनीही हळहळ व्यक्त केली आहे.

दरम्यान सिद्धार्थने २००८ मध्ये ‘बाबुल का आंगन छूटे ना’ या मालिकेतून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर टिव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’मधून त्याला खरी ओळख मिळाली. पुढे तो ‘बिग बॉस’च्या तेराव्या हंगामाचा विजेता म्हणूनही नावारुपाला आला. याव्यतिरिक्त ‘खतरो के खिलाडी’, ‘फिअर फॅक्टर’ या रिऍलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

फलंदाजासह प्रत्येकाला वाटलं चेंडू जाईल बाउंड्री पार, तितक्यात क्षेत्ररक्षणाने टिपला ‘कडक झेल’

ओव्हल कसोटीत घुमणार बूम बूमचा बुमरँग! ३ विकेट्स घेत ‘या’ महान वेगवान गोलंदाजाला पछाडणार

बड्डे बाॅय इशांत: ट्रोल तर कराच पण कौतूकाची थापही जरूर द्या!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---