मुंबई | आयपीएल २०१८ आता अंतिम टप्प्यात आली असुन आता साखळी फेरीचे केवळ ४ सामने बाकी राहिले आहेत. ६० सामन्यांपैकी ५६ सामने हे साखळी फेरीचे होणार आहेत.
या स्पर्धेचा शेवटचा सामना २७ मे रोजी मुंबईला खेळवला जाणार आहे. २०१८ची आयपीएल ही खऱ्या अर्थाने गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली होती. केवळ ५१ सामन्यात यावेळी ७६४ षटकार खेचले गेले आहेत.
यापुर्वी कधीही एवढे जास्त षटकार एकाच हंगामात मारले गेले नाहीत. सरासरी एका सामन्यात ७.०० षटकार या मोसमात मारले गेले आहेत. यापुर्वी कधीही ही सरासरी ६च्या पुढे गेली नाही.
प्रत्येक १६व्या चेंडूवर एक षटकार यावेळी मारला गेला आहे.
२०१२ साली आयपीएलमध्ये १४८ डावात ७३४ षटकार खेचले गेले होते. तर २०१४ला १२० डावात ७१४ षटकार मारले गेले होते.
या आयपीएलमध्ये ४ संघांना १०० पेक्षा जास्त षटकार मारले गेले आहेत. त्यात कोलकाता ११७, बेंगलोर ११५, दिल्ली १११ आणि चेन्नई ११० हे ते संघ आहेत.
विशेष म्हणजे ज्या संघानी १०० षटकार मारले आहेत त्यांनीच या आयपीएलमध्ये १०० षटकार दिले आहेत.
https://twitter.com/SherryPaaji/status/997737250174648320
https://twitter.com/SherryPaaji/status/997726497677889536?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fmahasports.co.in%2Ftotal-sixes-hit-in-ipl2018-764-ie-7-sixes-every-innings-or-a-six-every-16-balls%2F
महत्त्वाच्या बातम्या-
–मुंबई नाही तर या दोन संघांनी आयपीएलमध्ये केली आहे षटकारांची बरसात
–धोनी-कोहलीबद्दल झाला आयपीएलमध्ये विलक्षण योगायोग…!!!
–थोडं उशीरा, पण धोनीने केला हा भीमपराक्रम आपल्या नावे!