टी-20 विश्वचषकात बुधवारी (2 सप्टेंबर) नेदरलँढ्स विरुद्ध झिम्बाब्वे सामना खेळला गेला. झिम्बाब्वेला या सामन्यात 5 विकेट्सने पराभव स्वीकारला. तर दुसरीकडे नेदरलँड्सला मात्र विश्वचषकातील त्यांचा पहिला विजय मिळला. आता दोन्ही संघ प्रत्येकी एक-एक विजयासह चौथ्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज सिकंदर रजा या सामन्याता मोठी खेळी करू शकला नाही, पण त्याचा एक षटकार चाहत्यांचा खूपच आवडला आहे. आयसीसीने देखील या षटकाराची दखल घेत व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
सिकंदर रजा (Sikandar Raza) या सामन्यात 24 चेंडू खेळून 40 धावा करू शकला. त्याची ही खेळी जास्त मोठी नसली, तरी झिम्बाब्वेसाठी या सामन्यात सर्वाधिक धावा त्यानेच केल्या. झिम्बाब्वने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्याचे फलंदाज कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवू शकले नाहीत. सिकंदर रजाने सध्या सुरू असेलल्या विश्वचषक स्पर्धेत अनेक मोठे शॉट्स खेळले आहेत, पण नेदरलँड्सविरुद्ध त्याने मारलेला हा षटकार खरोखर डोळ्यांचे पारणे फेटणारा ठरला. आयसीसीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “रजा झोपेत देखील फलंदाजी करू शकतो.” चाहत्यांकडून या व्हिडिओव लाईक्सचा पाऊस पडत आहे, तर कमेंट्स देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत.
सिकंदर रजाने नेदरलँड्सविरुद्ध केलेल्या 40 धावा तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केल्या. नेदरलँड्सचा वेगवान गोलंदाज ब्रँडन ग्लोव्हर (Brandon Glover) याच्या चेंडूवर त्याने हा षटकार मारला. हा षटकार त्याने 14 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मारला. त्याने हा षटकार अगदी सहजपणे मारल्याचे दिसले. चेंडू बॅटवर लागल्यानंतर जो आवाज आला, तो कोणत्याकी क्रिकेटप्रेमीचा मनाला शांती देणारा होता.
https://www.instagram.com/reel/Ckck0acOwkW/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर झिम्बाब्वेसाठी रजाव्यतिरिक्त त्यांचा एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. झिम्बाब्वे संघ प्रथम फलंदाजीला आला, पण सर्व 20 षटके देखील खेळू शकला नाही. त्यांनी 19.2 षटकांमध्ये 117 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरा नेदरलँड्सने लक्ष्याचा पाठलाग करताना 18 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावत विजय मिळवला.
2022 सालात टी-20 क्रिकेटमध्ये सिकंदर रजाने केला आहे धमाका
सिकंदर रजा टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 2022 सालात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी एकूण 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामथ्ये 35.5 ची सरासरी आणि 151.40 च्या स्ट्राईक रेटने 701 धावा केल्या आहेत. या यादीत रजाच्या पुडे पाकिस्तानचा पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान आहे. रिजवानने यावर्षी 21 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 888 धावा कुटल्या. यादीत पहिला क्रमांक भारतीय दिग्गज सूर्यकुमार यादव आहे. सूर्याने यावर्षी खेळेलल्या 26 टी-20 सामन्यांमध्ये 935 धावा कुटल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलने वाढदिवसापूर्वीच गर्लफ्रेंडला दिले खास गिफ्ट, झळकावली 2022 टी20 विश्वचषकातील पहिली फिफ्टी
एका चेंडूने बनवले व्हिलन एकाने हिरो! जीवदान मिळाल्यावर दोन चेंडूच टिकू शकला रोहित