इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये गुरुवारी (4 एप्रिल) गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आमनेसामने होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. एकवेळ गुजरात टायटन्स हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं, परंतु त्यानंतर शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा या अनकॅप्ड खेळाडूंनी तुफानी फलंदाजी करत सामना गुजरातच्या हातून हिसकावून घेतला.
शशांक सिंगनं 29 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शशांक सिंग हा तोच खेळाडू आहे, जो लिलावादरम्यान बराच चर्चेत आला होता. पंजाब किंग्जनं त्याला चुकून विकत घेतल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु नंतर संघानं स्पष्ट केलं की तो आधीच त्यांच्या खेळाडूंच्या यादीत सामील होता.
आता हाच शशांक सिंग पंजाबसाठी तारणहार बनून समोर आला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध एकवेळ पंजाब किंग्जची अवस्था 12.2 षटकांत 5 बाद 111 धावा अशी दयनीय होती. तेव्हा शशांकनं क्रिजवर येऊन संघासाठी 25 चेंडूत अर्धशतक ठोकलं. मात्र जेव्हा त्याचं अर्धशतक पूर्ण झालं तेव्हा पंजाब किंग्जच्या डगआऊटमध्ये एकदम शांतता होती. संघाच्या एकाही खेळाडूनं शशांकसाठी साधी टाळीही वाजवली नाही.
हिंदी समालोचक आकाश चोप्रा यांनी लाइव्ह कॉमेंट्रीदरम्यान याकडे लक्ष वेधलं आहे. शशांकनं 17 व्या षटकात अजमतुल्ला ओमरझाईच्या चौथ्या चेंडूवर 50 धावा पूर्ण केल्या. या 50 धावा त्यानं अवघ्या 25 चेंडूंचा सामना करत बनवल्या. शिवाय तो पंजाब किंग्जच्या विजयाची शेवटची आशा म्हणून क्रीजवर उभा होता. मात्र संघाला अशा कठीण परिस्थितीतून बाहेर काढल्यानंतरही साथिदारांनी त्याचं थोडंसही कौतुक केलं नाही.
आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल झाला आहे. चाहते तो शेअर करत पंजाब किंग्जच्या संघाला चांगलंच फटकारत आहेत. शशांकनं गुजरातविरुद्ध 29 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी केली. या दरम्यान त्यानं 6 चौकार आणि 4 षटकार हाणले.
Worst behaviour ! 🥲
— V I P E R (@VIPERoffl) April 5, 2024
महत्त्वाच्या बातम्या-