भारतीय पुरूष क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये वनडे मालिका खेळली जात असून टी20 मालिका भारताने जिंकली. या दोन्ही मालिकेत खेळण्याची संधी रिषभ पंत याला मिळाली, मात्र त्याने निराशा केली. यामुळे सध्या एकच चर्चा सुरू आहे पंत की संजू सॅमसन. कसोटी क्रिकेटमध्ये पंतची जागा कोणीही घेऊ शकत नाही, मात्र मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये त्याला सॅमसनकडून टक्कर मिळत आहे.
मागील वनडे आणि टी20 सामन्यांची आकडेवारी पाहिला तर संजू सॅमसन (Sanju Samson) याने रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या तुलनेत उत्तम कामगिरी केली आहे. यामुळे सॅमसनला संधी द्या असे न्यूझीलंडच्या सायमन डॉल (Simon Doull) यांनी म्हटले आहे.
पंतने मर्यादित षटकांच्या 95 सामन्यांमध्ये 8 अर्धशतके आणि एक शतक करत एकूण 1842 धावा केल्या आहेत. दुसरीकडे सॅमसनने कमी सामने खेळले आहेत. त्याने 27 सामन्यांत 626 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटची आकडेवारी पाहिली तर सॅमसनने 66च्या तर पंतने 35च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यामुळेच डॉल यांना सॅमसन वनडे संघात हवा आहे.
माध्यमांशी बोलताना डॉल म्हणाले, “पंतची कामगिरी आतापर्यंत जेमतेमच राहिली आहे. त्याने 30 सामने खेळताना 35च्या सरासरीने धावा काढल्या. त्याचा स्ट्राईक रेटही चांगला आहे, मात्र संजू सॅमसनने 11 सामन्यांत 60च्या सरासरीने धावा केल्या आहेत. एक विकेटकीपर म्हणून त्याची कामगिरी उत्तम आहे. यामुळे त्याला एक तरी संधी मिळावी.”
सॅमसनला टी20 मालिकेसाठी संघात निवडण्यात आले होते, मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. दुसरीकडे त्याला पहिली वनडे खेळल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी पुन्हा एकदा बाकावर बसवले. यामुळे चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर कर्णधार शिखर धवन याने स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, संघाला सहाव्या गोलंदाजाची आवश्यकता होती. त्यामुळेच दीपक हुड्डाला घेतले आणि संजूला बसवले. INDvNZ: Simon Doull Comment on Sanju Samson & Rishabh Pant
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन भारतीय गोलंदाज
पाच नाही; सहा नाही, तब्बल 10 देशांत कसोटी शतके करणारे जगातील 2 फलंदाज