fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताच्या त्या अद्भूत विक्रमानंतर आता ऑस्ट्रेलियाने रचला इंग्लंडविरुद्ध इतिहास

September 17, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


मँचेस्टर। बुधवारी(१६ सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा वनडे सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्सने जिंकून मालिकाही २-१ ने आपल्या नावावर केली. या सामन्यात ३०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऍलेक्स कॅरी(१०६) आणि ग्लेन मॅक्सवेल(१०८) यांनी ऑस्ट्रेलियाकडून शतकी खेळी केली. विशेष म्हणजे ५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत विजय मिळवता आला आहे.

बुधवारी पार पडलेला सामना ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील निर्णायक सामना होता. कारण या सामन्याआधी दोन्ही संघांनी एक एक विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली होती. अखेर शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकाही जिंकली. आत्तापर्यंत ५ वेळा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात निर्णायक वनडे सामना झाला आहे. त्यातील ४ वेळा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर १ वेळा इंग्लंडने सामना जिंकला आहे.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या निर्णायक वनडे सामन्यांचा निकाल –

१९७२ – इंग्लंड विजयी

१९८१ – ऑस्ट्रेलिया विजयी

२००५ – ऑस्ट्रेलिया विजयी

२०१५ – ऑस्ट्रेलिया विजयी

२०२० – ऑस्ट्रेलिया विजयी

२०१७ पासून केवळ दुसरा पराभव  –

तसेच २०१७ पासून इंग्लंडने कमीत कमी ३ सामने असलेल्या एकूण १४ वनडे द्विपक्षीय मालिका खेळल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील केवळ २ मालिकेत इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. २०१७ ला त्यांना भारतात भारताविरुद्ध ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ ने पराभूत व्हावे लागले होते. तर त्यानंतर थेट ३ वर्षांनी ते ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका पराभूत झाले आहेत. म्हणजेच २०१७ पासून इंग्लंडला वनडे द्विपक्षीय मालिकेत (कमीतकमी ३ सामन्यांची मालिका) पराभूत करणारा ऑस्ट्रेलिया भारतानंतरचा केवळ दुसरा देश आहे.


Previous Post

मॅक्सवेल-कॅरीचा धमाका! ऑस्ट्रेलियाने जिंकली वनडे मालिका

Next Post

एमएस धोनीच्या पुनरागमनाबद्दल हा भारतीय दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, धोनीला पुन्हा…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB
टॉप बातम्या

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

आयसीसी वनडे क्रमवारी : विराट-रोहितचे वर्चस्व अबाधित, बुमराह देखील ‘या’ स्थानी कायम

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

एमएस धोनीच्या पुनरागमनाबद्दल हा भारतीय दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, धोनीला पुन्हा...

Photo Courtesy: Twitter/ IPL

...म्हणून केकेआर संघातील 'हा' खेळाडू आंद्रे रसेलशी जास्त बोलत नाही, घ्या कारण जाणून

Photo Courtesy: Twitter/IPL

धोनीचा सीएसके संघाला मोठा झटका; हा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.