टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा गाजवल्यानंतर आता टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देखील भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. मंगळवारी (३१ ऑगस्ट) भारताचा शूटर सिंगराज अडानाने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज सिंगराज अडानाने कांस्यपदक जिंकूले आहे. अडानाने पुरुषांच्या १० मीटर एयर पिस्टल पी १ इव्हेंटमध्ये हे पदक पदक मिळवले आहे. हे पदक मिळवल्यानंतर टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या नावे एकूण ८ पदकांची नोंद झाली आहे. ही भारताची पॅरालिम्पिक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
या शूटिंग इव्हेंटमध्ये अंतिम क्षणापर्यंत सिंगराज अडाना आणि चीनचा लू शियोलोंग या दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला होता. परंतु, दबावात असताना देखील अडानाने अप्रतिम कामगिरी केली आणि २१६.८ गुण मिळवत कांस्य पदकाला गवसणी घातली.
हे टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील शूटिंग इव्हेंटमध्ये भारताचे दुसरे पदक आहे. यापूर्वी भारताची १९ वर्षीय शूटर अवनी लेखराने सुवर्णपदक जिंकून इतिहासाला गवसणी घातली होती. यासह ती पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.(Singhraj Adana wins bronze medal for India in shooting event)
सिंगराज अडानाने अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. परंतु, अंतिम सामन्यात चीनचा लू शियोलोंगने त्याला जोरदार टक्कर दिली. १९ व्या शॉटमध्ये सिंगराजने ९.१ गुणांची कमाई केली होती. त्यावेळी तो टॉप ३ च्या शर्यतीतून बाहेर झाला होता. परंतु, त्याने २० व्या शॉटमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि ९.६ अंकांसह पुन्हा एकदा कांस्य पदकासाठी आपले स्थान निश्चित केले. लू शियोलोंगला या शॉट मध्ये अवघ्या ८.६ गुणांची कमाई करण्यात आली.
त्यानंतर पुढील दोन शॉटमध्ये सिंगराजने १०-१० गुणांची कमाई करत आपले कांस्यपदक निश्चित केले. तर चीनच्या चाओ यांग ने २३७.९ गुणांसह सुवर्णपदक मिळवले आणि चीनच्या जिंग हुआंग ने २३७.५ गुणांची कमाई करत रौप्यपदक मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या –
सुमीत अंटीलची सुवर्णमय कामगिरी! विश्वविक्रमासह भारताला मिळवून दिले दुसरे ‘सुवर्णपदक’
अरेरे! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या विनोद कुमारने जिंकलेले कांस्यपदक झाले ‘अमान्य’
गरजू खेळाडूंना प्रारंभीच्या काळात आर्थिक मदत करा – तेजस्विनी सावंत