ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन यांना सर्वकालीन महान फलंदाजांमध्ये गणले जाते. 27 ऑगस्ट, 1908 रोजी जन्मलेल्या ब्रॅडमन यांची आज 115वी जंयती आहे. ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहे. मात्र, त्यांच्या कारकिर्दीदरम्यान असलेल्या तंत्रज्ञानाअभावी त्यांची फलंदाजी सर्वांनाच पाहायला मिळाली नाही. पण, नॅशनल फिल्म एँड साऊंड आर्किव्ह ऑफ ऑस्ट्रेलियाने (NFSA) ब्रॅडमन यांची 74 वर्षांपूर्वीची एक रंगीत फुटेज 2020मध्ये जाहीर केली होती.
या फुटेजमध्ये सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) हे सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (SCG) एफ किपॅक्स आणि डब्ल्यूए ओल्डफिल्ड संघादरम्यानच्या प्रदर्शनीय सामन्यात खेळत आहेत. हा सामना 26 फेब्रुवारी 1949मध्ये खेळण्यात आला होता.
एनएफएसएने सांगितले आहे की, 16 एमएमच्या या फुटेजला जॉर्ज होब्स यांनी शूट केले आहे. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एबीसी सूचना विभागासाठी कॅमेरापर्सनचे काम केले होते. 66 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये आवाज ऐकायला येत नाही. पण, एससीजीवरती 41,000 च्या आसपास दर्शक असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
तसेच ब्रॅडमन यांचा हा एकमेव रंगीत व्हिडिओ फुटेज असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
This is the only known colour footage of #DonBradman playing #cricket, filmed at the AF Kippax and WA Oldfield testimonial match in Sydney, 26 February 1949!
It comes from a home movie donated by the son of cameraman George Hobbs.
Read more: https://t.co/0K36LLb77l pic.twitter.com/HwFPf2V9hF— NFSA National Film and Sound Archive of Australia (@NFSAonline) February 21, 2020
सर ब्रॅडमन यांनी त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीत एकूण 52 कसोटी सामने खेळले होते. ज्यात त्यांनी 6996 धावा केल्या होत्या. यात 29 शतकांचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश होता. त्यावेळी त्यांची सरासरी 99.94 इतकी होती. जी कसोटीमधील सर्वोच्च सरासरी आहे. तसेच, 11 जुलै 1930 रोजी लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्यांनी एकाच दिवसात सर्वाधिक 334 धावा केल्या होत्या.
याबरोबरच एका देशाविरूद्ध 5000हून अधिक धावा करण्याचा विक्रम सर ब्रॅडमनच्या नावावरती आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध एकूण 5028 धावा केल्या होत्या. तर, 1930च्या ऍशेस मालिकेदरम्यान त्यांनी 947 धावा केल्या होत्या. सर ब्रॅडमननी त्यांच्या कारकिर्दीत 12 द्विशतके केली आहेत. 2009मध्ये त्यांना आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले होते.
सर ब्रॅडमन यांना इग्लंड विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात त्यांच्या कारकिर्दीतील धावांची सरासरी 100पर्यंत नेण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज होती. मात्र या कसोटी सामन्यात सर ब्रॅडमन हे दुसऱ्याच चेंडूत त्रिफळाचीत झाले होते. त्यावेळी इंग्लंडचा लेगब्रेक गुगली गोलंदाज एरिक होलीज गोलंदाजी करत होता.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 234 सामन्यात 95.14च्या सरासरीने 28067 धावा केल्या होत्या. यात 117 शतक आणि 69 अर्धशतकांचा समावेश होता. क्रिकेटच्या या बादशहाचे 25 फेब्रुवारी 2001 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
हेही वाचा-
जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या 3 षटकात झळकावले होते शतक
सामना राहिला बाजूला अन् एकमेकांना भिडले पाकिस्तान-अफगाणिस्तानचे चाहते, स्टेडिअममध्येच राडा- व्हिडिओ