चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. शनिवारी (१५ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान भारतीय संघाने सामन्यावर पूर्ण पकड मिळवलेली दिसून येते.
भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर या सामन्यात विजयासाठी ४८२ धावांचे लक्ष ठेवले आहे. भारताच्या दुसऱ्या डावात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दमदार शतक ठोकले. मात्र, या शतकाचा आनंद त्याच्यासोबत नॉन स्ट्राइकला असलेल्या मोहम्मद सिराजला सर्वाधिक झाला. आनंदाच्या भरात सिराजने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अश्विनने ठोकले लाजवाब शतक
चेन्नई येथील खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देत आहे. या खेळपट्टीवर भारताचा प्रमुख फिरकीपटू आणि चेन्नईचाच रहिवासी असलेल्या रविचंद्रन आश्विनने दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत लाजवाब शतक ठोकले. त्याने १०६ धावांची खेळी केली. हे अश्विनचे कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक आहे. अश्विनने यापूर्वी आपली चारही शतके वेस्ट इंडिज विरुद्ध ठोकली होती.
सिराजने केले सेलिब्रेशन
रविचंद्रन अश्विनने डावाच्या ८२ व्या षटकात मोईन अलीच्या चेंडूवर चौकार मारत आपले शतक पूर्ण केले. यावेळी नॉन स्ट्राइकवर असलेल्या मोहम्मद सिराजला इतका आनंद झाला की, चेंडू चौकारापर्यंत पोहोचण्याआधीच त्याने सेलिब्रेशन सुरू केले होते. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच, सोशल मीडियावरून त्याच्या निस्वार्थ कृतीचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत.
A moment to cherish forever! @ashwinravi99 gets his Test💯 in Chennai and Md. Siraj erupts in joy. The dressing room stands up to applaud.🙌🏾 #TeamIndia #INDvENG @paytm pic.twitter.com/ykrBhsiTbl
— BCCI (@BCCI) February 15, 2021
😭❤️ https://t.co/QRASRsx8EA pic.twitter.com/HrF4hFHJ2w
— avgonanabacker (@le_tom_quack) February 15, 2021
भारतीय संघाने इंग्लंडला दिले ४८२ धावांचे आव्हान
रविचंद्रन अश्विनच्या १०६ व कर्णधार विराट कोहलीच्या ६२ धावांच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात २८६ धावा उभारल्या. तसेच, भारतीय संघाला पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी मिळाली होती. यामुळे भारतीय संघाने इंग्लंडसमोर २०० षटकात ४८२ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
देव, धोनी, भज्जी… यांच्याही अगोदर आता अश्विनला ‘आठवा’, पठ्ठ्याने विक्रमच केलाय तसा
सिराजचा हैदराबादी दणका! ठोकले दोन खणखणीत षटकार, ड्रेसिंग रूममध्ये पठ्ठ्याचं जंगी स्वागत
कहर! चेन्नई कसोटीत अश्विनचे शतक अन् सोबतच बळींचा पंचक, याआधी ‘इतक्यांदा’ केलंय असं