पुणे। आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेतर्फे सहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कटारिया हायस्कुल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे 24 ते 27 जानेवारी 2019 या कालावधीत रंगणार आहे.
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना डब्लूआयआरसी ऑफ आयसीएआयचे माजी उपाध्यक्ष सीए सर्वेश जोशी आणि पुणे विभागाचे अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया यांनी सांगितले कि, स्पर्धेला अमनोरा यांचे प्रायोजकत्व लाभले असून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड व केस्टो बाईक्स यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे. तसेच, या स्पर्धेत पुणे विभागातील 60 हुन अधिक नामांकित सीए संस्थानी सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण 16 संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेत बीस्मार्ट, फिनप्रो ऍक्सेस्, स्टॅलिअन्स, पीएचएम टायगर्स, सीए सुपरकिंग्ज, सी अँड एल स्ट्रायकर्स, प्रास इलेव्हन, मास्टर ब्लास्टर्स, रॉयल्स, सीए चॅलेंजर्स, एसबीएच स्मॅशर्स, किर्तने अँड पंडित, एसपीसीएम स्ट्रायकर्स, एसआरपीए इलेव्हन, पी अँड एस इलेव्हन, कल्याणीवाला अँड मिस्त्री हे 16 संघ झुंजणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेचे सलग सहावे यशस्वी वर्ष असून ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या व तृतीय क्रमांकासाठी करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांना करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेच्या सामन्यांचे निकाल क्रिकहिरोज येथे उपलब्ध असणार असून सामन्यांचे प्रक्षेपण युट्यूबवर दाखविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये सीए योगेश पोद्दार, सीए सचिन पारख, सीए सुमित शहा, सीए अमोल चंगेडिया, सीए अक्षय पुरंदरे, सीए भूषण शहा यांचा समावेश आहे.