जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्याकडे लागले आहे. या सामन्यात भारत विरुद्ध इंग्लंड आमने-सामने असतील. दोन्ही संघात 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे होणाऱ्या विजेतेपदाच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्याच्या हेतूने मैदानावर उतरतील. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय ताफ्यात काही बदल होऊ शकतात. मात्र, सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोण खेळेल? याबद्दल कर्णधार रोहित शर्मा याने हिंट दिली आहे.
रोहितने दिली हिंट
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यापूर्वी मोठी हिंट दिली आहे. त्याने याद्वारे स्पष्ट केले आहे की, रिषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांच्यापैकी कुणाला संधी मिळू शकते. रोहितने पत्रकार परिषदेमध्ये म्हटले की, “झिम्बाब्वे संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्हाला माहिती नव्हते की, आमचा अंतिम सामना कोणत्या संघाविरुद्ध होणार आहे. रिषभ पंत याने या स्पर्धेत अनधिकृत सराव सामन्याव्यतिरिक्त इतर कोणताही सामना खेळला नव्हता. आम्हाला माहिती नव्हते की, उपांत्य सामना कुणाशी होईल. त्यामुळे त्याला संधी दिली होती.”
रोहितने पुढे सांगितले की, “कोणत्याही खेळाडूला तुम्ही थेट उपांत्य सामन्यात उतरवू शकत नाहीत. आम्ही विचार केला की, जर आम्हाला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाची आवश्यकता असेल, त्यामुळे पंतला झिम्बाब्वेविरुद्ध उतरवले. पुढील सामन्यासाठी दोन्ही यष्टीरक्षक उपलब्ध आहेत. उद्या निर्णय घेऊ की कोण खेळेल?” रोहितच्या या वक्तव्यातून अशी हिंट मिळते की, कार्तिक पुनरागमन करू शकतो. कारण, तो या स्पर्धेतील चार सामन्यात खेळला आहे. मात्र, दोन्ही यष्टीरक्षकांना मोठी खेळी करता आली नाहीये.
असेही म्हटले जात आहे की, रिषभ पंतला उपांत्य फेरी सामन्यासाठी संधी मिळू शकते. कारण, तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. तसेच, भारताकडे पहिल्या 6 खेळाडूंमध्ये कोणताही डावखुरा फलंदाज नाहीये. अशात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे, परंतु अनुभव पाहिला, तर दिनेश कार्तिक त्याच्याही पुढे असेल. मात्र, कार्तिकचे यष्टीरक्षण या स्पर्धेत चिंतेचा विषय राहिले आहे.
अशात कोणत्या खेळाडूला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Skipeer Rohit Sharma hints Dinesh Karthik will play instead of Rishabh Pant in the Semi Final against England)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 क्रमवारीत सूर्या अव्वल स्थानावर कायम! केएल राहुल आणि अर्शदीप सिंगला फायदा, विराट 11व्या स्थानावर
अरे हे काय, ऍडलेड ओव्हलच्या सेमीफायनलमध्ये नाणेफेक ‘हरण्यासाठी’ रोहित-जोसमध्ये चढाओढ! कारणच चकित करणारे