भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 17 मार्च) खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. पहिल्या वनडेत भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे खेळू शकला नाही. त्याच्या जागी हार्दिक पंड्या याच्याकडे नेतृत्व होते. सामन्यादरम्यान असे काही झाले, जे पाहून विराट कोहली याचे चाहते भलतेच नाराज आहेत. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय खेळाडूंना सार्थ असल्याचे सिद्ध केले. ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव 35.4 षटकात 188 धावांवरच संपुष्टात आला होता. यावेळी भारताकडून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, रवींद्र जडेजा याने 2, तर पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
हार्दिकचे विराटसोबत गैरवर्तन?
झाले असे की, ऑस्ट्रेलियाच्या डावातील 20व्या षटकादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) हा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांच्यासोबत उभा राहून काहीतरी बोलत होता. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट हा पंड्याला काहीतरी समजवू इच्छित होता, परंतु पंड्या त्याचे काही एक न ऐकताच निघून गेला. यामुळे विराटही अस्वस्थ झाला. यावेळी त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की, जसे तो म्हणतोय, ‘जा, जे करायचंय ते मनाने कर.’ हार्दिक त्याच्याच धुंदीत पुढे जात राहिला आणि विराटकडे वळूनही पाहिले नाही.
https://twitter.com/cricadda/status/1636723210854236162?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1636723210854236162%7Ctwgr%5E789cf20b689b416247b1619d9d8b3d2111fa2725%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-hardik-pandya-ignored-virat-kohli-and-misbehaved-during-1st-odi-against-australia-for-kuldeep-yadav-5571043.html
हार्दिकने यापूर्वी दाखवलाय कर्णधारपदाचा घमंड!
नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्या मालिकेतही हार्दिक पंड्या याच्याकडे नेतृत्व होते. माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला की, “बाहेर जे काही बोललं जातं, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. हा माझा संघ आहे. त्यामुळे मला आणि प्रशिक्षकाला जो योग्य वाटेल, त्यालाच खेळवू.”
ऑस्ट्रेलियाच्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. यावेळी भारताने 83 धावसंख्येवर आपल्या 5 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सांभाळत संघाला सामना जिंकून दिला. (skipper hardik pandya ignored virat kohli and misbehaved during 1st odi against australia for kuldeep yadav)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जडेजा आणि माझा फक्त एकच प्लॅन होता…’, वानखेडेत वादळ आणणाऱ्या राहुलकडून रणनीतीचा खुलासा
‘तो कॅचसाठी पळत नाही, चेंडू स्वत:च…’, जडेजाने अफलातून कॅच पकडताच धोनीचं ‘ते’ ट्वीट व्हायरल