एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली 4 आयपीएल ट्रॉफी जिंकणारा चेन्नई सुपर किंग्स 4 वर्षांनंतर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळणार आहे. आयपीएल 2023 स्पर्धेचा सहावा, तर चेन्नईचा दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध सोमवारी (दि. 3 एप्रिल) या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांसोबतच संघातील खेळाडूही खूपच उत्सुक आहेत. धोनी आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा यादगार क्षण असेल. मात्र, या सामन्यात पहिल्यांदाच असे होईल, जेव्हा चाहत्यांना चेन्नई संघाचा एक विस्फोटक खेळाडू चेपॉकच्या मैदानावर खेळताना दिसणार नाही. तो खेळाडू इतर कुणी नसून सुरेश रैना आहे. रैना चेन्नईमध्ये ‘चिन्ना थाला’ नावाने प्रसिद्ध आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंंट्स संघात (Chennai Super Kings vs Lucknow Supur Kings) पार पडणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नईला गुजरात टायटन्स संघाकडून 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1642738593109266432
आयपीएलमधून रैना निवृत्त
‘मिस्टर आयपीएल’ नावाने ओळखल्या जाणारा सुरेश रैना (Suresh Raina) याने 2021मध्ये त्याचा शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. 2022च्या लिलावात त्याला कोणताही खरेदीदार न मिळाल्याने त्याने आयपीएलसह घरगुती क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. खरं तर, 15 ऑगस्ट, 2020 रोजी एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासोबतच रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
पहिल्यांदाच घडणार ‘असं’
चेन्नईचे चाहते यावेळी चेपॉक स्टेडिअम (Chepauk Stadium) येथे ‘चिन्ना थाला’ रैनाला खेळताना पाहू शकणार नाहीत. मात्र, पहिल्यांदाच एक युवा खेळाडू या मैदानावर चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसेल. तो खेळाडू इतर कुणी नसून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आहे. 26 वर्षीय ऋतुराजने त्याच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने आयपीएल 2023च्या पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध 92 धावांची खेळी साकारली होती.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1641836949706276864
आता चेन्नई सुपर किंग्स संघाचे चाहते या खेळाडूला घरच्या मैदानावर खेळताना पाहण्यासाठी खूपच उत्सुक झाले आहेत. (Skipper ms dhoni chennai super kings comeback ma chidambaram stadium after 4 years suresh raina ruturaj gaikwad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादचा ‘सूर्य’ बुडवत युझवेंद्र चहलचा भीमपराक्रम! बनला टी20त ‘असा’ कारनामा करणारा एकमेव भारतीय
Video: तब्बल 55000 फॅन्समध्ये एकट्या चहलच्या पत्नीने लुटली वाहवा, टाळ्यांच्या कडकडाटासह केले चीअर