ऑस्ट्रेलिया संघाने गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्सने पराभव केला. तसेच, विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक दिली. विशेष म्हणजे, वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची ही ऑस्ट्रेलियाची 8वी वेळ होती. आता ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात दोन हात करेल. मात्र, त्यापूर्वी उपांत्य सामना जिंकल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स याने मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला कमिन्स?
पॅट कमिन्स (Pat Cummins) याने ऐतिहासिक विजयानंतर सामना आणि खेळपट्टीविषयी विधान केले. तो म्हणाला, “मला वाटते की, डगआऊटमध्ये बसण्यापेक्षा तिथे जास्त सोपे होते. काही तास भीती वाटली, पण विजय मिळवणे चांगले राहिले. आशा नव्हती की, स्टार्क आणि हेजलवूड इतक्या लवकर आपली षटके पूर्ण करतील. आम्हाला माहिती होते की, इथली खेळपट्टी नंतर वळण घेईल, पण थोडे ढगही दाटले होते. त्यामुळे पहिली गोलंदाजी करण्याविषयी जास्त निराश नव्हतो. आम्ही क्षेत्ररक्षणाविषयी खूप चर्चा करतो, कदाचित स्पर्धेच्या सुरुवातीला ही उच्च दर्जाची नसेल, पण आज आम्ही शानदार होतो.”
ट्रेविस हेडने घेतल्या महत्त्वाच्या विकेट्स
पॅट कमिन्सने ट्रेविस हेड याच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. तो म्हणाला की, “हेड आज मधल्या षटकांमध्ये महत्त्वाच्या विकेट्स घेणारा व्यक्ती होता. इंग्लिशने खूप चांगला खेळ दाखवला. तो तिथे पूर्णपणे नियंत्रित दिसला, खासकरून दोन चांगल्या फिरकीपटूंविरुद्ध. आमच्यापैकी काहींनी अंतिम सामना खेळला आहे. इतर लोक टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळले आहेत. अंतिम सामन्यात स्टेडिअम खचाखच भरलेलं असेल. जास्तकरून एकतर्फी असेल, पण हे गळाभेट घेण्यासारखे आहे. 2015 विश्वचषक कारकीर्दीचे मुख्य आकर्षण होते. त्यामुळे भारतात आणखी एक अंतिम सामना खेळण्यासाठी आम्ही संघाच्या रूपात खूपच खुश आहोत आणि अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.”
विश्वचषक 2023च्या दुसऱ्या उपांत्य (World Cup 2023 Second Semi Final) सामन्यात दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याची सेना 212 धावांपर्यंतच मजल मारू शकली. यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने 7 विकेट्स गमावत 47.2 षटकात 215 धावा केल्या आणि 3 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. (skipper pat cummins big statement after australia vs south africa semifinal world cup 2023)
हेही वाचा-
World Cup 2023 सोबतच ‘या’ स्टार खेळाडूचं करिअरही संपलं, आता कधीच खेळणार नाही वनडे क्रिकेट
“या वयातही देशाची जर्सी घालून…”, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर ताहीर भावूक