पाच वेळचा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला मंगळवारी (दि. 16 मे) लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला. लखनऊविरुद्ध चांगली सुरुवात करूनदेखील मुंबईचा 5 धावांनी नजीकचा पराभव झाला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने पराभवाचे खापर गोलंदाजांवर फोडले. यासोबतच तो म्हणाला की, अखेरच्या 3 षटकात धावा खर्च करणे महागात पडले.
झाले असे की, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनऊच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच इकाना स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात संघाने 20 षटकात 3 विकेट्स गमावत 177 धावांचा डोंगर उभारला होता. यावेळी मुंबईच्या गोलंदाजांनी अखेरच्या 3 षटकात 54 धावा लुटवल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाने 5 विकेट्स गमावत 172 धावाच केल्या. त्यामुळे हा सामना लखनऊने 5 धावांनी जिंकला.
काय म्हणाला रोहित?
सामन्यानंतर 25 चेंडूत 37 धावांची खेळी करून बाद झालेला रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आम्ही चांगले खेळलोच नाही. काही क्षण आले होते, ज्यांचा फायदा घ्यायला पाहिजे होता, पण तसे होऊ शकले नाही. दुर्दैवी ठरले, पण आम्हाला मनोबल ऊंच ठेवावे लागेल.”
आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या विकेटच्या भागीदारीत ईशान किशन याच्यासोबत 58 चेंडूत 90 धावा चोपणाऱ्या रोहितने पुढे म्हटले की, “आम्ही खेळपट्टीचे चांगले आकलन केले होते. ही आधीसारखी नव्हती आणि फलंदाजीसाठी चांगली होती. आम्ही दुसऱ्या टप्प्यात लय गमावली. गोलंदाजांनीही अखेरच्या तीन षटकात खूप धावा खर्च केल्या.”
प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या संभावनेबाबत तो म्हणाला की, “मला माहिती नाही की, आकडे काय सांगतात. आम्हाला पुढील प्रत्येक सामना कोणत्याही स्थितीत जिंकायचा आहे.”
सामन्याविषयी थोडक्यात
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर इकाना स्टेडिअममध्ये मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात मार्कस स्टॉयनिस याने 47 चेंडूत नाबाद 89 धावा केल्या. तसेच, अखेरच्या षटकात मोहसिन खान यानेही शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे लखनऊने मुंबईविरुद्ध 5 धावांनी रोमांचक विजय साकारला. या विजयासह लखनऊचे 15 गुण झाले आहेत. तसेच, ते प्ले-ऑफच्या जवळ गेले आहेत. (skipper rohit sharma blames bowlers after mumbai indians lost to lucknow super giants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हरभजनची BCCIकडे कळकळीची विनंती, ‘या’ 2 युवा धुरंधरांना लवकरात लवकर घ्या टीम इंडियात
मुंबईला हरवण्यासाठी लखनऊच्या मालकाचं देवाकडे साकडं! व्हिडिओ तुफान व्हायरल