भारतीय संघाने नागपूर कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतलेला, पण तो निर्णय भारतीय गोलंदाजांनी सपशेल चुकीचा ठरवला. भारतीय फिरकीपटूंनी कमालीची गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांवरच गुंडाळला. यावेळी भारताकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला येत भारताकडून कर्णधार रोहित शर्मा याने वादळी फटकेबाजी केली. त्याने खणखणीत शतक झळकावले. शतकानंतर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिनेदेखील प्रतिक्रिया दिली होती, जी आता जोरदार व्हायरल होत आहे.
रोहित शर्माचे शतक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटीच्या पहिल्या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. भारताचे स्टार खेळाडू केएल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली नियमित अंतराने तंबूत परतले. मात्र, एका बाजूने रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मोर्चा सांभाळला आणि मैदानावर फटकेबाजी केली. त्याची फलंदाजी पाहून विरोधी संघाच्या गोलंदाजांनाही घाम फुटला. रोहितने यावेळी 212 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 120 धावा चोपल्या. यासह तो भारतासाठी कर्णधार म्हणून तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक झळकावणारा पहिला खेळाडू बनला.
रोहिने शतक झळकावताच पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्यात तिने “रोहित माझे तुझ्यावर प्रेम आहे, पण कृपया करून तुला माझ्यासाठी बदली बोट पाठवावे लागेल.”
रोहितची वादळी फलंदाजी
रोहित शर्मा हा वादळी फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितचे हे नववे शतक होते, तर त्याने आतापर्यंत एकूण 43 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत.
सामनावीर जडेजा
भारतीय संघाने नागपूर कसोटीत पहिल्या तीन दिवसातच विजय मिळवून दाखवला. या सामन्यातील पहिल्या डावात जडेजाने 5 विकेट्स घेण्यासोबतच 70 धावांचे मोलाचे योगदानही दिले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जडेजाने 2 विकेट्स चटकावल्या. त्यामुळे जडेजाला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. रोहित आणि जडेजाव्यतिरिक्त अक्षर पटेलने 84 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर आर अश्विन याने संपूर्ण सामन्यात सर्वाधिक 8 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद शमी 3, मोहम्मद सिराज आणि अक्षरने प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (skipper rohit sharma increased the pain of wife ritika sajdeh by century in nagpur test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पुन्हा चढणार बोहल्यावर! व्हॅलेंटाईन डेला उदयपूरमध्ये रंगणार शाही विवाहसोहळा
प्रेम हे! पंतच्या लेटेस्ट फोटोवर गर्लफ्रेंड ईशा नेगीने ओवाळून टाकला जीव, पाहा मन जिंकणारी कमेंट