पाच वेळा आयपीएल स्पर्धेचा किताब पटकावणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स होय. मुंबईने आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात खराब केली. मात्र, सलग दोन पराभवानंतर मुंबईने सलग तीन सामने जिंकत हॅट्रिक पूर्ण केली. स्पर्धेतील 25व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स आमने-सामने होते. हा सामना मुंबईने 14 धावांनी खिशात घातला. तसेच, सलग तिसरा विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादला अखेरच्या षटकात विजयासाठी 20 धावांची आवश्यकता होती. मात्र, अर्जुन तेंडुलकर याने भेदक मारा करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा याने अर्जुनसोबतच तिलक वर्मा याचेही कौतुक केले.
काय म्हणाला रोहित?
रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आमच्या संघात अनेक नवीन खेळाडू आहेत, जे कधीही आयपीएलमध्ये खेळले नाहीत. आम्हाला त्यांची साथ द्यायची आहे. ते हळूहळू लय मिळवत आहेत.” रोहितने त्याच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात हैदराबादमध्ये डेक्कन चार्जर्ससोबत केली होती. 2009मध्ये डेक्कन चार्जर्स संघाने आयपीएलचा किताब जिंकला होता. रोहित म्हणाला की, “मी इथे तीन हंगाम खेळलो आहे. या मैदानाशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. इथे फलंदाजी करायला आवडते.”
रोहित आता पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करत आहे. आपल्या फलंदाजीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे. मी जे करत आहे, ते मला आवडत आहे. नक्कीच मला पुढचे पाऊल टाकायचे आहे, पण ही एक वेगळी भूमिका आहे. आम्ही सुरुवातीलाच लय ठरवायची आहे.”
तिलक वर्माचे कौतुक
मुंबई इंडियन्स संघात अनेक नवीन युवा गोलंदाज आहेत. रोहित म्हणाला की, त्यांना संधी द्यायला आवडेल. रोहित शर्माने तिलक वर्माचे कौतुक (Rohit Sharma Praise Tilak Varma) केले. तो म्हणाला की, “मला तिलकचा दृष्टीकोन आवडतो. तो गोलंदाजांना खेळत नाही, तर चेंडूंचा सामना करत आहे. तुम्ही लवकरच त्याला दुसऱ्या संघाकडून खेळताना पाहाल.”
3⃣7⃣(17) @ 2⃣1⃣7⃣ – Tilak 🔥 आहे#OneFamily #SRHvMI #MumbaiMeriJaan #IPL2023 #TATAIPL @TilakV9 pic.twitter.com/r87nfzVpLQ
— Mumbai Indians (@mipaltan) April 18, 2023
अर्जुनचीही केली प्रशंसा
तिलकनंतर त्याने अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याचेही कौतुक केले. तो म्हणाला की, “अर्जुनसोबत खेळणे खूपच रोमांचक आहे. आयुष्याने एक चक्र पूर्ण केले आहे. अर्जुन मागील तीन वर्षांपासून संघाचा भाग आहे. मी त्याला मोठे होताना पाहिले आहे. त्याला माहिती आहे की, त्याला काय करायचे आहे. त्याला याबाबत खूप आत्मविश्वासही आहे. त्याला नवीन चेंडू स्विंग करायचा आहे. तसेच, तो अखेरच्या षटकात यॉर्करही फेकतो.”
Hat-trick of wins, and we are in 𝓟𝓐𝓡𝓐𝓓𝓘𝓢𝓔 😉#OneFamily #SRHvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL pic.twitter.com/0mBm5Wt33R
— Mumbai Indians (@mipaltan) April 18, 2023
सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 192 धावा केल्या. यामध्ये कॅमरून ग्रीन याच्या सर्वाधिक नाबाद 60 धावांचा समावेश होता. तसेच, तिलक वर्मा याने 17 चेंडूत 37 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त ईशान किशन (38), रोहित शर्मा (28) आणि टीम डेविड (16) यांनी दोन आकडी धावसंख्या पार केली. सूर्यकुमार यादव फक्त 7 धावा करून बाद झाला. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला 19.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 178 धावाच करता आल्या.
Cameron Green is adjudged Player of the Match for his scintillating knock of 64 off 40 deliveries and bowling figures of 1/29 as @mipaltan win by 14 runs.
Scorecard – https://t.co/oWfswiuqls #TATAIPL #SRHvMI #IPL2023 pic.twitter.com/TCf9LjaK2C
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
या विजयानंतर मुंबईने गुणतालिकेत 6 गुणांसह 6व्या स्थानी उडी घेतली. मुंबईचा पुढील सामना 22 एप्रिल रोजी पंजाब किंग्स संघाविरुद्ध आहे. (skipper rohit sharma praised tilak varma and arjun tendulkar after mumbai indians beat sunrisers hyderabad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सर्वात मोठी बातमी! भारताविरुद्धच्या WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलिया संघ घोषित, ‘या’ दिग्गजांचे पुनरागमन
ग्रीनच्या ‘ऑलराऊंड’ कामगिरीने मुंबईची विजयाची हॅट्रिक! अखेरच्या षटकात अर्जुन तेंडुलकरचा तिखट मारा