IPL 2024: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अजून काही महिने बाकी आहेत. मात्र, त्यापूर्वी फ्रँचायझी आपल्या संघात मोठे बदल करताना दिसत आहेत. अशातच कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या कर्णधाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याचे चाहते भलतेच खुश होतील. चला तर, काय निर्णय घेतलाय जाणून घेऊयात…
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात केकेआर (KKR) संघाचे नेतृत्व करणाऱ्या नितीश राणा (Nitish Rana) याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले असून त्याला उपकर्णधार बनवले आहे. तसेच, मागील हंगामात दुखापतीमुळे खेळू न शकलेला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला पुन्हा एकदा केकेआरचा कर्णधार (Shreyas Iyer KKR Captain) बनवले आहे. आता आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात श्रेयस अय्यर पुन्हा एकदा केकेआरचे नेतृत्व करताना दिसेल.
Quick Update 👇#IPL2024 @VenkyMysore @ShreyasIyer15 @NitishRana_27 pic.twitter.com/JRBJ5aEHRO
— KolkataKnightRiders (@KKRiders) December 14, 2023
Shreyas Iyer reappointed as KKR captain.
Nitish Rana to be the Vice Captain. pic.twitter.com/Np7cwMSZis
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 14, 2023
काय म्हणाला श्रेयस?
नितीश राणा याच्या नेतृत्वाविषयी बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला की, “नितीशने शानदार कामगिरी केली. त्याने फक्त माझी जागा भरून काढली नाही, तर उल्लेखनीय नेतृत्वही केले. केकेआरने त्याला उपकर्णधार म्हणून नेमल्याचा मला खूप आनंद आहे. यामुळे नेतृत्वगट मजबूत होईल यात तीळमात्र शंका नाही.”
नितीश राणाचे 2023मधील प्रदर्शन
नेतृत्व करण्यासोबतच नितीश राणाने आयपीएल 2023 स्पर्धेत बॅटमधूनही चांगली कामगिरी केली. त्याने 14 सामने खेळताना 31.77च्या सरासरीने 413 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 3 अर्धशतकेही झळकावली. 75 ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या होती.
केकेआरची आयपीएल 2023मधील कामगिरी
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल 2023 हंगामात चांगले प्रदर्शन केले होते. त्यांनी 14 सामने खेळताना 6 सामन्यात विजय मिळवला होता, तर 8 सामन्यांवर पाणी सोडावे लागले होते. गुणतालिकेत सातव्या स्थानी राहून केकेआर संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. (Skipper Shreyas Iyer returns as Kolkata Knight Riders captain when Nitish Rana to be his deputy)
हेही वाचा-
भारताच्या रणरागिनींचा जलवा! पदार्पणाच्या कसोटीत शुभा अन् जेमिमाने झळकावली फिफ्टी, संघ मजबूत स्थितीत
माजी दिग्गज वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘मी बाबरला कर्णधारपद…’