---Advertisement---

विराटला हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हवा आहे भारतीय संघात…

On: शुक्रवार, मे 24, 2019 6:08 PM
---Advertisement---

2019 विश्वचषकाला आता केवळ 6 दिवसांचा कालावधी राहिला आहे. येत्या 30 मेपासून या विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी  आयसीसीने गुरुवारी(23 मे) सर्व सहभागी संघांच्या कर्णधारांचे संवाद सत्र आयोजित केले होते.

या संवाद सत्रात पत्रकारांनी सर्व कर्णधारांना अनेक प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न असा होता की जर प्रतिस्पर्धी संघातील एका खेळाडूला तूमच्या संघासाठी निवडायचे असेल तर कोणाची निवड कराल?

या प्रश्नावर सर्व कर्णधारांनी गमतीशीर उत्तरे दिली. यामध्ये सर्वात प्रथम इयान मॉर्गनने उत्तर देताना सध्या खेळत असलेल्या कोणत्याही खेळाडूची निवड न केली नाही पण त्याने त्याऐवजी त्याच्या संघाच्या कोचिंग स्टाफसाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगची निवड केली. पॉटिंग हा सध्या ऑस्ट्रेलिया संघाचा मार्गदर्शक आहे.

यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली मजेशीरपणे म्हणाला, ‘कठिण प्रश्न आहे. मला वाटते आमचा संघ बऱ्यापैकी मजबूत आहे. पण जर मला एक खेळाडूला निवडायचे असेल आणि तो सध्याच्या संघातील असेल तर…’ याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस विराटला म्हणाला ‘तू एबी डिविलियर्सला निवडू शकत नाही.’

डु प्लेसिसच्या या वाक्यावर सर्वांनाच हसू आले. तसेच यावर विराट म्हणाला, ‘अरे, मी डिविलियर्सचच नाव घेणार होतो. पण तो निवृत्त झाला आहे. त्यामुळे मी फाफची निवड करेल. तो चांगला मित्र आहे. त्याच्याबरोबर फलंदाजी करायला आवडेल.’

अन्य कर्णधारांनी केली या खेळाडूंची निवड – 

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने जॉस बटलरची निवड केली. तर बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मुर्तझाने विराट कोहलीला पसंती दिली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने कागिसो रबाडाची निवड केली. तसेच केन विलियमसनने राशिद खानची तर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने बेन स्टोक्सला पसंती दिली.

विशेष म्हणजे डु प्लेसिसने एका खेळाडूची निवड करण्याऐवजी तीन गोलंदाजांची निवड केली. त्याने भारताच्या जसप्रीत बुमराहची, अफगाणिस्तानच्या राशिद खानची आणि ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सची निवड केली. तसेच त्याला जेव्हा गमतीने विचारले की तो विराटची निवड करणार नाही का. त्यावर तो म्हणाला ‘विराट माझ्या फलंदाजीच्या संघात असेल. हा माझा गोलंदाजीचा संघ आहे.’

तसेच विंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने कोणत्याच खेळाडूची निवड केली नाही. तर अफगाणिस्तानचा कर्णधार गुलाबदिन नाईबने हुशारीने उत्तर देताना सांगितले की सामन्याच्या परिस्थितीवर हे अवलंबून असेल.’

या कारणामुळे विराटने केली डुप्लेसिसची निवड – 

विराटने या संवाद सत्रानंतर डुप्लेसिसची निवड करण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. याचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यामध्ये विराटने सांगितले की ‘तो(डु प्लेसिस) असा एक खेळाडू आहे जो पुढे येऊन नेतृत्व करतो आणि खेळाकडे पाहण्याकडे आमच्या विचारात साम्य आहे. तो शैलीपूर्ण फलंदाज आहे. तसेच त्याने त्याच्या संघाचे चांगले नेतृत्व केले आहे. तसेच तो चांगला खेळाडू आहे.’

‘खेळाला उत्तम प्रकारे ओळखणाऱ्या अशा खेळाडूबरोबर खेळायला मजा येते. तसेच आमची मानसिकताही सारखी आहे. त्यामुळे असे काही गुण आहेत ज्यामुळे मी त्याची निवड केली.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीच्या मते हा संघ वनडेमध्ये करेल सर्वप्रथम ५०० धावा

विश्वचषक २०१९: या ५ अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या कामगिरीकडे असेल लक्ष

विश्वचषक २०१९: या कारणामुळे काही सामन्यांसाठी बदलणार टीम इंडियाची जर्सी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment