गुरुवार, 30 मेपासून आयसीसी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी सर्व सहभागी संघांनी आपल्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहेत. भारतीय संघाच्या जर्सीचेही काही दिवसांपूर्वी अनावरण झाले आहे. पण आता काही सामन्यांसाठी भारतीय संघाला त्यांच्या जर्सीमध्ये बदल करावे लागणार आहेत.
आयसीसीने यावेळी जर्सीबद्दल एक नवीन निर्णय घेतला आहे. या नियमानुसार प्रत्येक संघ या विश्वचषकात घरचे आणि बाहरचे या पद्धतीने सामने खेळणार आहेत. त्यामुळे यजमान इंग्लंड व्यतिरिक्त अन्य सर्व संघ घरच्या आणि बाहेरच्या सामन्यांसाठी दोन वेगवेगळ्या जर्सीमध्ये खेळणार आहेत.
काही रिपोर्टच्या अनुसार हा निर्णय आयसीसीने फुटबॉल प्रमाणे क्रिकेटला अधिक रोमांचकारी बनवण्याच्या दृष्टीने घेतला आहे. फुटबॉलमध्ये घरच्या आणि बाहेरच्या सामन्यांसाठी वेगवेगळी जर्सी असते. मात्र अजूनही आयसीसीने या नियमाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांपैकी इंग्लंड, भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांची पहिली जर्सी ही निळ्या रंगछटेतील आहे. तर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघांची पहिली जर्सी हिरव्या रंग छटेतील आहेत.
हा विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार असल्याने इंग्लंड हा यजमान देश आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खेळताना अन्य सर्व संघ त्यांच्या दुसऱ्या जर्सीमध्ये म्हणजेच बाहेरच्या सामन्यांसाठी असणाऱ्या जर्सीमध्ये खेळताना दिसेतील.
त्यामुळे भारतीय संघ 30 जूनला इंग्लंड विरुद्ध खेळताना त्यांच्या दुसऱ्या जर्सीमध्ये खेळल. तसेच 22 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यातही भारतीय संघ दुसरी जर्सी घालून खेळेल.
काही वृत्तांनुसार भारतीय संघाची दुसरी जर्सी ही पुढील बाजूने गडद निळी असेल. तर हाताला आणि पाठिच्या बाजूला नारंगी रंग असेल. पण अजून या जर्सीचे अनावरण झालेले नाही.
भारतीय संघ या विश्वचषकात पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. पण त्याआधी भारताचा पहिला सराव सामना 25 मे ला न्यूझीलंड विरुद्ध तर दुसरा सराव सामना 28 मे ला बांगलादेश विरुद्ध होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाने असा अनोख्या प्रकारे केला सराव, पहा व्हिडिओ
–२०१९ विश्वचषकात हे संघ गाठतील उपांत्य फेरी, सचिन तेंडुलकरने वर्तवला अंदाज






