---Advertisement---

रुट नंतर आता स्मिथनेही टाकले विराटला पिछाडीवर, शतक झळकावत रचलाय नवा विक्रम

On: शनिवार, जुलै 9, 2022 3:02 PM
Steve Smith Virat Kohli & Joe Root
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (SlvsAUS) यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. गॉल स्टेडियम येथे सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने शतक केले आहे. त्याचे हे कसोटीमधील २८वे शतक ठरले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने हे शतक १९३ चेंडूत झळकावले आहे. शतक करताच त्याने इंग्लंडचा जो रुट (Joe Root) याच्या शतकाची बरोबरी केली आहे.

रुटने नुकत्याच एजबस्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध नाबाद शतकी खेळी केली होती. त्याचे हे कसोटीमधील २८वे शतक ठरले होते. यामुळे सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्मिथ आणि रुट संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत.

श्रीलंकेविरुद्ध खेळताना स्मिथने तब्बल एक वर्षानंतर शतक झळकावले आहे. त्याने ८७वा सामना कसोटी सामना खेळताना १५३व्या डावात हे शतक केले आहे. दुसऱ्या दिवशीही तो खेळपट्टीवर उपस्थित होता तेव्हा ऑस्ट्रेलियाची एक बाजू कोसळत असताना दुसरी बाजू लढवत त्याने धावफलक हलता ठेवला. ऑस्ट्रेेलियाचा पहिला डाव ३६४ धावांतच संपुष्टात आला आहे. तर स्मिथ १४५ धावा करत नाबाद राहिला आहे.

दुसरीकडे भारताचा विराट कोहली (Virat Kohli) हा मागील दोन वर्षापासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्याने डिसेंबर २०१९मध्ये कोलकाताच्या इडन गार्डनवर बांगलादेश विरुद्ध शतक केले होते. त्यानंतर त्याच्या बॅटमधून शतक आलेच नाही. यामुळे त्याला फक्त रुटनेच नाहीतर आता स्मिथनेही मागे टाकले आहे. यामुळे विराट कधी शतक करणार याची आता उत्सुकता वाटत आहे. भारत बांगलादेश विरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामने खेळणार आहेत. यामध्ये शतकी खेळी करण्याची त्याला संधी आहे.

विराट, स्मिथ आणि रुट यांच्यात शतके करण्यामध्ये विराट नेहमी पुढे राहिला आहे. मात्र मागील काही काळापासून तो धावा करण्यात अपयशी ठरत आहे. विराटने कसोटीमध्ये २७ आणि वनडेमध्ये ४३ शतके केली आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७० शतके असून तो स्मिथ आणि रुटच्या खूप पुढे आहे.

विराटने भारताकडून २००८मध्ये वनडे सामना खेळत पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १०२ कसोटीमध्ये ४९.५३च्या सरासरीने ८०७४ धावा केल्या असून २६० वनडे सामन्यांमध्ये ५८.०७ सरासरीने १२३११ धावा केल्या आहेत. तसेच ९७ टी२० सामने खेळताना ५१.५० सरासरीने ३२९६ धावा केल्या आहेत.

सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये दोन टी२० सामने खेळायचे बाकी असून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या सामन्यांमधून त्याच्याकडून चाहते ७१व्या शतकाची अपेक्षा करत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

शिखर धवनने उलघडले फलंदाजीच्या सरावाचे गूपित! म्हणाला, सुरुवातीपासूनच…

भुवनेश्वर काय बटलरची पाठ सोडना!, गेल्या दोन्ही सामन्यात दियाल ‘गोल्डन डक’

पंत, कार्तिक, इशान?, दुसऱ्या टी२० सामन्यात कोणत्या यष्टीरक्षकाला संधी मिळणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---