श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. उभय संघातील हा कसोटी मालिका कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती आणि मालिका संपल्यानंतर श्रीलंका संघाला मोठा फायदा झाला, तर ऑस्ट्रेलियाला मात्र गुणतालिकेतील पहिला क्रमांक गमवावा लागला.
श्रीलंक आणि ऑस्ट्रेलिया (SL vs AUS) यांच्यातील ही कसोटी मालिका १-१ असा बरोबरीवर सुटली. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियन संघाने १० विकेट्स राखून जिंकला होता, परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांना लाजिरवाणा पराभव मिळाला. दुसरा कसोटी सामना श्रीलंकेने एक डाव आणि ३९ धावांनी जिंकला. या विजयानंतर श्रीलंकन संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (World Test Championship) गुणतालिकेत १२ गुण मिळाले आणि त्यांचा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. यापूर्वी श्रीलंका सहाव्या स्थानावर होता. श्रीलंकन संघाकडे एकूण ५४.१७ टक्के गुण आहेत. त्यांनी आतापर्यंत ८ सामने खेळले, त्यापैकी ४ सामन्यात विजय, तर ३ सामन्या पराभव स्वीकारला आहे.
ऑस्ट्रेलियाकडे या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी जवळपास ७८ टक्के गुण होते, पण पराभवानंतर त्यांचे गुण ७० टक्के झाले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत पहिल्या वरून दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाने अजिंक्यपद स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धचा पहिलाच पराभव पत्करला आहे. यापूर्वी खेळलेल्या सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने ६ विजय मिळवले होते, तर ३ सामने अनिर्णीत झाले होते. दक्षिण आफ्रिकी संघ आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, ज्यांच्याकडे ७१.४३ टक्के गुण आहेत. आफ्रिकी संघ आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये ५ विजय, तर २ पराभव पत्करले आहेत.
ताज्या क्रमवारीत भारत आणि पाकिस्तन संघ प्रत्येकी एक-एक स्थानाने खाली घसरले आहेत. पाकिस्तानने ७ सामने खेळले आहेत आणि त्यांच्याकटे ५२.०८ टक्के गुण आहेत आणि त्यांचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा विचार केला, तर त्यांना आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांपैकी ६ सामने जिंकले आहेत, तर २ सामने गमावले आहेत. संघ ५२.०८ टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आला आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताला पराभव मिळाला होता आणि आता गुणतालिकेतही नुकसान सोसावे लेगले आहे.
गुणतालिकेतील दुसऱ्या संघांचा विचार केला, तर वेस्ट इंडीज ५० टक्के गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंड ३३.३३ टक्के गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. गतविजेत्या न्यूझीलंडकडे २५.९३ गुण आहेत आणि त्यांचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. १३.३३ गुणांसह बांगलादेशचा संघ सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकदिवसीय मालिकेत भारताला सतवायला इंग्लंडचे ‘हे’ खेळाडू सज्ज, कसोटीनंतर वनडेत करणार पुनरामन
ओव्हलचे मैदान कोण गाजवणार?, वाचा दोन्ही संघांची प्लेइंग११ आणि पिच रिपोर्ट
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ साठी भारताचा महिला संघ जाहिर, वाचा कोणकोणत्या खेळाडूंना मिळाली संधी