---Advertisement---

पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर, तब्बल 776 दिवसांनंतर स्टार खेळाडूची दमदार एंट्री!

On: बुधवार, जानेवारी 21, 2026 4:38 PM
---Advertisement---

न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाला मोठा धक्का बसल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष दोन आंतरराष्ट्रीय मालिकांकडे लागलं आहे. एकीकडे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका रंगणार असून, दुसरीकडे इंग्लंडचा श्रीलंका दौरा सुरू होत आहे. वर्ल्ड कपपूर्व तयारीच्या दृष्टीने या दोन्ही मालिका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

न्यूझीलंडने भारत दौऱ्यात दमदार कामगिरी करत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली. विशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच न्यूझीलंडने वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या पराभवानंतर टीम इंडिया आता टी20 मालिकेत पुनरागमन करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका 21 जानेवारीपासून सुरू होत आहे. वर्ल्ड कपपूर्वीची ही शेवटची टी20 मालिका असल्याने दोन्ही संघ आपल्या अंतिम संयोजनावर लक्ष केंद्रित करतील.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा श्रीलंका दौरा गुरुवार, 22 जानेवारीपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या वनडेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने परंपरेनुसार काही तास आधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.

श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत इंग्लंड संघाचं नेतृत्व हॅरी ब्रूक करणार आहे. विशेष बाब म्हणजे सुमारे दोन वर्षांनंतर सलामीवीर झॅक क्रॉलीने इंग्लंडच्या वनडे संघात पुनरागमन केलं आहे. क्रॉलीसोबत बेन डकेट सलामीला उतरणार असून, मधल्या फळीत जो रूट, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक आणि जोस बटलर यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

श्रीलंकेतील फिरकीस पोषक खेळपट्ट्या लक्षात घेता इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकीवर भर दिला आहे. आदिल रशीद आणि लियाम डॉसन हे प्रमुख फिरकीपटू संघात असून, ऑलराउंडर विल जॅक्स त्यांना साथ देणार आहे. वेगवान गोलंदाजीत सॅम करन आणि जेमी ओव्हरटन यांच्याकडे मदार असेल.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाचं नेतृत्व चरिथ असलंका करणार आहे. मायदेशात इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध विजय मिळवण्याचं आव्हान श्रीलंकेसमोर असणार आहे. वर्ल्ड क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मालिकांकडे चाहत्यांचं विशेष लक्ष लागून राहिलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---