---Advertisement---

पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या का बांधल्या होत्या? बीसीसीआयने दिले मोठे कारण

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2024 3:45 PM
---Advertisement---

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आज पासून मैदानात उतरला आहे. टीम इंडियाचा पहिला सामना आज कोलंबो येथे खेळवला जात आहे. सामन्याआधी रोहित शर्मा जेव्हा टाॅस करण्यासाठी मैदानात आला तेव्हा त्याच्या हाताला काळी पट्टी बांधले होते. ज्यामुळे सर्वांच्याच मानत मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. तत्तपूर्वी श्रीलंकेनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

वास्तविक, 31 जुलैच्या रात्री भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे निधन झाले होते. माजी प्रशिक्षक बऱ्याच दिवसांपासून रक्ताच्या कर्करोगामुळे आजारी होते. अलिकडेच ते लंडनहून उपचार करुन परतले होते. पण या रोगापासून ते जास्त दिवस जगू शकले नाही. शेवटी मुंबईतील घरामध्ये वयाच्या 71 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने बीसीसीआयसह अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्यांना श्रध्दांजली दिली. तर आता भारतीय संघ देखील दिग्गज क्रिकेटपटूला श्रध्दांजली देण्यासाठी पहिल्या सामन्यात हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहे.

अंशुमन गायकवाड यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्ल बोलायचं झाले तर, त्यांनी भारतासाठी 40 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्याने 30.07 च्या सरासरीनं 1985 धावा केल्या. कसोटीमध्ये त्यांच्या नावावर 10 अर्धशतक, 2 शतक आणि 1 द्विशतक आहे. कसोटीमध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या 201 राहिली. जी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध केली होती. गायकवाड यांनी सप्टेंबर 1983 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 201 धावांची खेळी केली होती. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी भारतासाठी 15 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यामध्ये 14 डावात 20.69च्या सरासरीने 269 धावा केल्या. यादरम्यान त्यांचा स्ट्राईक रेट 52.84 राहिला. एकदिवसीय त्यांच्या नावावर 1 अर्धशतक आहे, तर सर्वोच्च धावसंख्या नाबाद 78 होता.

हेही वाचा-

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड
IND VS SL: पहिल्या सामन्यात यजमान संघानं जिंकला टाॅस, जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग 11
श्रीलंकेच्या कॅम्पमध्ये पसरली भीतीची लाट! टीम इंडिया आठ महिन्यानंतर वनडे सामन्यासाठी मैदानात उतरणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---