महिला आशिया चषक 2022 स्पर्धेला विजेता संघ मिळाला आहे. शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) सिल्हेट मैदानावर पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यात भारताने 8 विकेट्सने सामना खिशात घातला. आतापर्यंत खेळलेल्या 8 आशिया चषकांमधील भारताचे हे सातवे विजेतेपद होते. या सातव्या विजेतेपदासाठी खेळलेल्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा मान स्म्रीती मंधना हिने पटकावला. यावेळी तिने एक इतिहासही रचला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंका महिला संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना त्यांनी 20 षटकात 9 विकेट्स गमावत 65 धावांची खेळी केली आणि भारताला 66 धावांचे आव्हान दिले. हे सोपे आव्हान भारताने सहजरीत्या पार केले. अवघ्या 8.3 षटकात भारतीय फलंदाजांनी 2 विकेट्सच्या मोबदल्यात 71 धावा करून विजय मिळवला. भारताकडून यावेळी स्म्रीती मंधना (Smriti Mandhana) हिने सर्वाधिक धावा चोपल्या. तिने 25 चेंडूंचा सामना करताना 51 धावांची खेळी साकारली. या धावा करताना तिने 3 षटकार आणि 6 चौकारही मारले. यामुळे तिच्या नावावर वेगवान अर्धशतकाची (Smriti Mandhana Fastest Fifty) नोंद झाली.
https://twitter.com/BCCIWomen/status/1581218541469986816
विशेष म्हणजे, महिला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा मान फक्त आणि फक्त स्म्रीती मंधना हिला मिळालाय आहे. ही यादीदेखील स्म्रीतीच्या नावांनीच भरलेली आहे. वेगवान अर्धशतक झळकावण्याची ही तिची तिसरी वेळ होती. यापूर्वी तिने 2019मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 24 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले होते. त्याआधीही तिने 2018मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 25 चेंडूत वेगवान अर्धशतक साकारले होते.
भारतीय महिला संघासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक झळकावणारी खेळाडू
24 चेंडूत- स्म्रीती मंधना, विरुद्ध- न्यूझीलंड (2019)
25 चेंडूत- स्म्रीती मंधना, विरुद्ध- इंग्लंड (2018)
25 चेंडूत- स्म्रीती मंधना, विरुद्ध- श्रीलंका (2022)*
स्म्रीती मंधनाची टी20 कारकीर्द
भारतीय महिला संघाकडून खेळताना स्म्रीती मंधना हिने शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. तिने 102 सामन्यात 98 डावात फलंदाजी करताना 27.38च्या सरासरीने 2437 धावा केल्या आहेत. या धावा करताना तिचा स्ट्राईक रेट हा 123.01 इतका होता. यादरम्यान तिची सर्वोत्तम धावसंख्या ही 86 इतकी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिंकलो रे! भारताने श्रीलंकेला लोळवलं, उंचावली महिला आशिया चषकाची सातवी ट्रॉफी
पैसाच पैसा! फक्त इंस्टाग्रामवरून विराटने कमावलेत इतके कोटी; त्याच्यापुढे केवळ हे दोघे






