---Advertisement---

शतक ठोकताच मानधनाने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय महिला!

On: शनिवार, जून 28, 2025 9:48 PM
---Advertisement---

Smriti Mandhana created history: भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात अत्यंत शानदार पद्धतीने केली आहे. नॉटिंगहॅमच्या मैदानावर सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात तिच्या बॅटमधून एक उत्कृष्ट शतकी खेळी पाहायला मिळाली. मालिकेतला पहिल्या सामन्यात टाॅस हरल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता, त्यानंतर मानधनाच्या 112 धावांच्या दमदार खेळीमुळे भारतीय महिला संघ 20 षटकांत 5 गडी गमावून 210 धावांचा डोंगर उभारण्यात यशस्वी ठरला. (Smriti Mandhana century)

स्मृती मानधनाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात इंग्लिश गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. तिने 62 चेंडूंत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. आपल्या या शतकी खेळीच्या जोरावर मानधना ही तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय) शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. (First Indian woman all formats century) जागतिक क्रिकेटमध्ये पाहिले तर, स्मृती मानधना ही कामगिरी करणारी आतापर्यंतची केवळ पाचवी महिला खेळाडू आहे. इंग्लंडमध्ये टी20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारी मानधना ही आतापर्यंतची दुसरीच भारतीय महिला खेळाडू आहे, तिच्या आधी ही कामगिरी केवळ हरमनप्रीत कौरने केली होती. (Harmanpreet Kaur T20I century)

इंग्लंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक 50+ धावांच्या खेळी करण्याच्या बाबतीत मानधनाने बेथ मुनीच्या रेकाॅर्डशी बरोबरी केली आहे. 8 वेळा 50+ खेळीसह ती संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. (T20I century England) मानधनाच्या नावावर कसोटीत 2 शतकी खेळी आहेत, तर वनडे क्रिकेटमध्ये तिने 11 शतके झळकावली आहेत.

महिला टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणाऱ्या खेळाडू

हीथर नाईट
टॅमी ब्यूमाँट
लॉरा वोल्वार्ड्ट
बेथ मुनी
स्मृती मानधना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---