इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी20 सामना भारतीय संघाचा विस्फोटक सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने गाजवला. महाराष्ट्र राज्यातील मुंबईच्या स्म्रीतीने इंग्लंडच्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रौद्रावतार धारण केला आणि शानदार फलंदाजी करत डावाखेर नाबाद राहिली. तिच्या योगदानामुळे भारतीय संघाने 16.4 षटकातच 8 विकेट्सच्या फरकाने हा सामना जिंकला. आपल्या या खेळीसह तिने इंग्लंडचा घातक सलामीवीर जोस बटलर याचा विक्रम मोडकळीस आणला आहे.
स्म्रीती मंधानाचा झंझावात
इंग्लंडच्या 143 धावांच्या (England vs India) आव्हानांचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने प्रभावी खेळी केली. तिने 53 चेंडू खेळताना 149 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. 13 चौकारांच्या मदतीने तिने नाबाद 79 धावा केल्या. तिच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघ इंग्लंडचे आव्हान सहजरित्या पार करू शकला. स्म्रीतीला तिच्या या दमदार खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
जोस बटलरला टाकले मागे
तसेच आपल्या या खेळीदरम्यान स्म्रीतीने इंग्लंडचा पुरुष क्रिकेटपटू बटलरला (Jos Buttler) मागे सोडले आहे. ती आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (Most T20I Runs) करण्याच्या यादीत बटलरच्या पुढे गेली आहे. स्म्रीतीचा हा 94 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. या 94 सामन्यात तिने 2294 धावा केल्या आहेत. यामध्ये तिच्या 17 अर्धशतकांचा समावेश आहे. तर बटलरने इतकेच (94 सामने) आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 2227 धावा जोडल्या आहेत. बटलरने या धावा जोडताना 1 शतक आणि 15 अर्धशतके केली आहेत.
https://twitter.com/BCCIWomen/status/1569779306154557441?s=20&t=x_H_KBn4C_6Wb2tHw2fYzQ
भारताकडून सर्वाधिक धावा करणारी तिसरी फलंदाज
याखेरीज स्म्रीती महिला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर अव्वलस्थानी आहे. हरमनप्रीतने 131 सामने खेळताना 1 शतक आणि 8 अर्धशतके करत 2597 धावा केल्या आहेत. तर माजी कर्णधार मिताली राज हिचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. मितालीने 89 टी20 सामने खेळताना 17 अर्धशतकांच्या मदतीने 2364 धावा जोडल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अब आयेगा मजा! स्म्रीतीच्या झंझावातापुढे उडाले इंग्लंड, टी20 मालिका 1-1ने बरोबरीत
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियात जागा, आता बनलाय हुकुमी एक्का; वाचा सूर्यकुमारच्या संघर्षाची कहाणी
दुःखद बातमी! अवघ्या 34 व्या वर्षी चॅम्पियन बॉक्सरने घेतला अखेरचा श्वास; शेवटची इच्छाही झाली पूर्ण