---Advertisement---

विक्रमी शतक झळकावल्यानंतर मंधनावर कौतुकाचा वर्षाव, या माजी क्रिकेटरने म्हटले ‘ऑफ साईडची देवी’

On: शनिवार, ऑक्टोबर 2, 2021 12:56 AM
---Advertisement---

भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये ऐतिहासिक दिवस रात्र कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय महिला खेळाडू स्म्रीती मंधानाने तुफानी खेळी करत शतक झळकावले आहे. तिने या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ( १ ऑक्टोबर) एलिस पेरीच्या चेंडूवर चौकार मारून आपले कसोटी कारकिर्दीतील पहिले वहिले शतक झळकावले. या खेळीनंतर अनेक दिग्गजांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी देखील ट्विट करत तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. यासह तिला एक खास उपाधी दिली आहे.

ऐतिहासिक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाकडून शेफाली वर्मा आणि स्म्रीती मंधानाने पहिल्या बळीसाठी ९३ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर शेफाली वर्मा ३१ धावा करत माघारी परतली होती. तर स्म्रीती मंधानाने तुफान फटकेबाजी सुरूच ठेवली होती.

तिने ५२ क्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार मारला आणि इतिहासाला गवसणी घातली. तिने १७० चेंडूंमध्ये आपले पहिले वहिले कसोटी शतक झळकावले.

या शतकी खेळीनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी तिचे ट्विट करत कौतुक केले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी ट्विट करत तिला, “ऑफ साईडची देवी” असे म्हटले आहे. ऑफ साईडचा देव यापूर्वी सौरव गांगुलीला म्हटले जायचे. डाव्या हाताच्या स्म्रीती मंधानाने ऑफ साइडला अप्रतिम कव्हर ड्राईव्ह मारले जे पाहून वसीम जाफर खुश झाले. त्यामुळेच त्यांनी स्म्रीती मंधानाला ‘ऑफ साईडची देवी’ अशी उपाधी दिली आहे.

तर माजी भारतीय क्रिकेटपटू आरपी सिंगने देखील ट्विट करत तिचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले की, “क्रिकेटमध्ये शतक झळकावणे नेहमीच एक खास क्षण असतो.जर ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही भारताकडून ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात शतक झळकावत असाल तर शब्दात तुमचे कौतुक केले जाऊ शकत नाही.”

स्म्रीती मंधानाच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिलेच शतक आहे. तसेच ती ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारी पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे.तर पिंक बॉल कसोटी सामन्यात शतक झळकावणारी ती विराट नंतर दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनीचं मास्टरमाईंड की आणखी काही? काय आहे सीएसकेचे सर्वात आधी प्लेऑफमध्ये पोहचण्याचं कारण; घ्या जाणून

‘तुमच्या पाठीमागे कोण कसंय…’, म्हणत सनरायझर्सच्या डगआऊटमध्येही स्थान न मिळाल्याने हळहळला वॉर्नर

KKR vs PBKS: केएल राहुलचे कर्णधारपदाला साजेसे अर्धशतक, पंजाबकडून कोलकाताचा ५ विकेट्सने पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---