---Advertisement---

WMPL च्या अनुभवावर काय म्हणाली स्मृती मंधाना

On: शुक्रवार, जून 6, 2025 3:36 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेची सुरुवात 5 जूनपासून झाली. पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले.‌ दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाने रायगड रॉयल्सला पराभूत करत दमदार सुरुवात केली. या सामन्यात रत्नागिरी जेट्स भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वाखाली उतरले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला शानदार खेळ दाखवत असलेल्या स्मृती हिने या स्पर्धेबद्दल प्रतिक्रिया दिली.

डब्ल्यूएमपीएलमध्ये स्मृती रत्नागिरी जेट्स संघाचे नेतृत्व करते. स्पर्धेआधी झालेल्या ड्राफ्टमध्ये तिची संघाची आयकॉन खेळाडू म्हणून निवड झाली होती. त्यानंतर थेट स्पर्धेत सहभागी झाल्यावर ती म्हणाली,
“आज डब्ल्यूएमपीएचा पहिलाच दिवस होता. हा अनुभव शानदार राहिला. दिवसातील दोन्ही सामने चांगले रंगले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा हा उत्कृष्ट उपक्रम आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येथे मुली डब्ल्यूएमपीएल खेळत आहेत. त्यांना हा अनुभव नक्कीच कामे येईल. एकमेकींचे क्रिकेटबद्दल असलेले ज्ञान वाटले जातेय. ज्याचा भविष्यात त्यांना फायदा होईल.”

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वात एमसीएने यांनी 2023 मध्ये महाराष्ट्र प्रिमियर लीगची सुरुवात केली होती. त्यानंतर आता दोन वर्षांनी महिलांसाठी देखील तसेच व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. डब्ल्यूएमपीएलमध्ये चार संघ सहभागी होत असून, यामध्ये रत्नागिरी जेट्स, पुणे वॉरियर्स, रायगड रॉयल्स व सोलापूर स्मॅशर्स या संघांचा समावेश आहे. स्मृतीसह तेजल हसबनीस, अनुजा पाटील व किरण नवगिरे या आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू देखील स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.

रत्नागिरी जेट्स विरुद्ध रायगड रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात रायगड संघाने प्रथम फलंदाजी करताना 159 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार स्मृती मंधाना व गौतमी नाईक यांनी 9.1 धावांची भागीदारी केली. स्मृती हिने 35 तर गौतमी हिने 70 धावा केल्या. त्यांच्या योगदानाच्या जोरावर रत्नागिरीने चार विकेट्स राखून विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---