भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (wriddhiman saha) याला निवडले गेले नाहीय. याच पार्श्वभूमीवर तो निराश असल्याचे दिसले आहे. त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) यांच्यासोबत झालेली चर्चा सार्वजनिक केली. साहाने उचललेल्या या पावलानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि सौरव गांगुलींचे भाऊ स्नेहाशीष गांगुली (snehashish ganguly) यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
स्नेहाशीष गांगुली म्हणाले की, “रिद्धिमान साहाने सौरव गांगुली, निवडकर्ते किंवा इतर कोणासोबत झालेली चर्चा सार्वजनिक करून चूक केली आहे. साहाने रणजी ट्रॉफीतून माघार घ्यायला नको होती, तो बंगालच्या संघासोबत सहभागी झाला पाहिजे होता.”
स्नेहाशीष गांगुली यावेळी म्हणाले की, “माझ्या मते साहाला ज्या गोष्टी बोर्ड किंवा निवडर्त्यांकडून सांगितल्या गेल्या, त्या वैयक्तिक होत्या. त्याच्यासाठी दरवाजे नेहमीच उघडे आहेत, त्याने रणजी ट्रॉफीत खेळायला हवी होती. पण काही कारणास्तव त्याने स्वतःचे नाव मागे घेतले होते.”
दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध कसोटीसाठी संघातून वगळल्यानंतर रिद्धिमान साहाने खुलासा केला की, “जेव्हा त्याने न्यूझीलंडविरुद्ध ६१ धावांची खेळी केली होती, तेव्हा सौरव गांगुलींनी त्याला मेसेज करून शुभेच्छा दिल्या होत्या. गांगुलींनी त्यावेळी साहाला सांगितले होते की, ते जोपर्यंत बीसीसीआयमध्ये आहेत, तोपर्यंत त्याला कसलीही अडचण येणार नाही.”
साहाने मुलाखतीत सांगितले होते की, “जर बीसीसीआय अध्यक्ष अशी गोष्ट बोलत असतील, तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढतो. पण मला समजले नाही की, गोष्टी इतक्या लवकर कशा बदलल्या”. साहाने सांगितल्याप्रमाणे मुख्य प्रशिक्षक चेतन शर्मा यांनीही त्याच्याशी फोनवर चर्चा केली आणि सांगितले होते की, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याची निवड होणार नाही, कारण निवडकर्ते भविष्यासाठी नवी यष्टीरक्षकांच्या शोधात आहेत.
साहाने यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडवर देखील खुलासा केला होता. त्याने सांगितल्याप्रमाणे राहुल द्रविडने त्याला निवृत्तीचा विचार कर, असा सल्ला दिला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर द्रविडनेही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएमधून बीसीसीआयला मिळणार ५०० अब्ज रुपये? मोठ-मोठ्या कंपन्या शर्यतीत
व्यंकटेशच्या रूपात भारताला मिळाला टी२०चा ‘नवा फिनिशर’, हार्दिकसाठी बंद झाले पुनरागमनाचे रस्ते?
पूरनच्या फॉर्मने हैदराबादला चढले स्फुरण; भारताविरुद्ध सलग तीन अर्धशतकांसह मोठे विक्रम नावावर