29 जून 2024 ही तारीख भारतीय क्रिकेटमध्ये (Indian cricket) कायमची खास राहील. आईसीसी ट्रॉफीचा 11 वर्षांचा दुष्काळ या दिवशीच संपला होता. जसप्रीत बुमराह (juspreet bumrah & hardik pandya) आणि नंतर हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या हातून विजय खेचून घेतला तसेच, सीमारेषेजवळ सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) घेतलेला तो अविश्वसनीय झेल अजूनही चाहत्यांना थरारून टाकतो. आजच्याच दिवशी रोहित शर्माच्या (Rohit Sharma’s team india) संघाने बार्बाडोसमध्ये विजयाचा झेंडा फडकावला होता.
फायनलमध्ये विराट कोहलीची (Virat Kohli) अमूल्य 76 धावांची खेळी, अक्षर पटेलने (Axar Patel) 31 चेंडूत केलेल्या 47 धावा आणि बुमराहचा तो घातक स्पेल हे या ऐतिहासिक विजयातले महत्त्वाचे क्षण होते. कॅरिबियन भूमीवर टीम इंडियाला (Team india) दुसऱ्यांदा टी-20 चॅम्पियन बनवण्यात अनेक खेळाडूंनी मोठा वाटा उचलला होता.
या विजयाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा भावुक झाले आहेत. दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर हा कधीच विसरता न येणारा क्षण सांगितला आहे.
टी-20 वर्ल्ड कप जिंकून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हार्दिक पांड्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणी सांगताना दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. तो दिवस आपण सगळेच विसरणार नाही. सगळ्यांसाठी खास दिवस. तसेच आपण हे विसरून चालणार नाही की, फाइनल मधील शेवटच षटक हार्दिक पांड्यानेचं टाकलं होतं.
शेवटच्या षटकामध्ये दक्षिण आफ्रिकेला (South Africa) विजयासाठी 16 धावांची गरज होती. पण हार्दिकने पहिल्याच चेंडूवर डेविड मिलरला बाद करून मोठा धक्का दिला. सीमारेषेवर सूर्यकुमार यादवने जबरदस्त झेल घेतला. हार्दिकने अखेरच्या षटकामध्ये फक्त 8 धावा देत भारताला दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेता बनवले. संपूर्ण सामन्यात त्याने केवळ 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
रोहित शर्मानेही आपल्या इंस्टाग्रामवर टीम इंडियाच्या विजयाची छायाचित्रे शेअर केली. त्या फोटोंमध्ये लिहिले होते, “तो दिवस जो कायम आपल्या आठवणीत राहील.” रोहितची कर्णधार म्हणून कामगिरी संपूर्ण स्पर्धेत शानदार होती. भारतीय संघाला एकही सामना गमवावा लागला नाही. सेमीफायनलमध्ये हिटमॅनने तुफान फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि 39 चेंडूत 57 धावांची झंझावाती खेळी केली.






