---Advertisement---

चर्चा तर होणारच ना! रिषभ पंत, विरेंद्र सेहवागच्या धुवांधार फलंदाजीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

On: शनिवार, मार्च 6, 2021 1:23 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी शुक्रवारचा दिवस पर्वणी ठरला. चाहत्यांना शुक्रवारी भारताच्या आजी-माजी दोन खेळाडूंना तुफानी फलंदाजी करताना पाहण्याची संधी मिळाली. हे दोन खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग. या दोघांनी शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर चर्चा होती.

पंतने घेतला इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार

सध्या अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात रिषभ पंतने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतकी खेळी केली. त्याने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १०१ धावा केल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरसह ७ व्या विकेटसाठी ११३ धावांची भागादारी रचली. दरम्यान या खेळीत त्याने जेम्स अँडरसनच्या एका चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारत चौकार वसूल केला, ज्याचे सर्वांनी कौतुक केले.

त्याच्या शतकामुळे दुसऱ्या दिवसाखेर भारताने ७ बाद २९४ धावा उभारल्या. तसेच भारताने ८९ धावांची आघाडीही घेतली.

रोड सेफ्टी सिरीजमध्ये विरुचा आक्रमक अंदाज 

मागीलवर्षी कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेल्या ‘वर्ल्ड रोड सेफ्टी सिरिज’ स्पर्धेला शुक्रवारपासून (५ मार्च) पुन्हा सुरुवात झाली. पहिलाच सामना इंडिया लिजंड्स विरुद्ध बांगलादेश लिजंड्स संघात सामना पार पडला. या सामन्यात इंडिया लिजंड्स संघाने विरेंद्र सेहवागच्या तुफानी खेळाच्या जोरावर १० विकेट्सने विजय मिळवला.

बांगलादेशने दिलेल्या १०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाली इंडिया लिजंड्सकडून विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांची जोडी उतरली होती. सेहवागने डावाची सुरुवात नेहमीच्या शैलीत पहिल्या दोन चेंडूंवर चौकार ठोकत केली. त्याने ३५ चेंडूंमध्ये १० चौकार व ५ षटकारांसह ८० धावांची नाबाद खेळी केली.

सोशल मीडियावर पंत-सेहवागचीच चर्चा

एकाच दिवशी पंत आणि सेहवागला तुफानी खेळ करताना पाहिल्यानंतर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहिंनी त्या दोघांना ‘गुरु-शिष्य’ असेही संबोधले आहे.

https://twitter.com/vikkibuddy_/status/1367892292212715523

https://twitter.com/Rajesh273208207/status/1367888097774505985

https://twitter.com/happytohelp1610/status/1367878814521421826

रिषभचे सेहवागला उत्तर

रिषभची शतकी खेळी पाहिल्यानंतर सेहवागने शुक्रवारी दुपारी एक खास ट्विट केले होते. ज्यात एक मीम शेअर केले होते, ज्यावर लिहिले होते की, ‘अरी दादा! मजौ आगौ’. तसेच ट्विटमध्ये लिहिले होते की ‘रिषभ पंतला अँडरसनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपच्या फटक्यासह चौकार मारताना आणि नंतर षटकारासह शतक करताना माझी अवस्था. दॅट्स माय बॉय.’

या ट्विटला पंतने रात्री उत्तर दिले की ‘तुम्हालाच फॉलो करत आहे विरु पाजी, सर्वोत्तम व्यक्तीकडून शिकतोय.’

आता ९ मार्चला इंडिया लिजंड्सचा सामना केविन पीटरसन कर्णधार असलेल्या इंग्लंड लिजंड्स संघाविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

धक्कादायक! अनेक भारतीय धावपटूंच्या यशात मोलाचे योगदान देणारे प्रशिक्षक वसतिगृहात आढळले मृतावस्थेत

Video: वय झालं तरीही वाघ तो वाघच! चाहत्यांना पुन्हा दिसले विरुचे जुणे रुप, पहिल्याच चेंडूवर ठोकला जबरदस्त चौकार

युवराज पुन्हा ऑन फायर! बांगलादेशच्या दोन फलंदाजांना केले क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---