रायपूर। मागीलवर्षी कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेल्या ‘वर्ल्ड रोड सेफ्टी सिरिज’ स्पर्धेला शुक्रवारपासून (५ मार्च) पुन्हा सुरुवात झाली. पहिलाच सामना इंडिया लिजंड्स विरुद्ध बांगलादेश लिजंड्स संघात सामना पार पडला. या सामन्यात इंडिया लिजंड्स संघाने विरेंद्र सेहवागच्या तुफानी खेळाच्या जोरावर १० विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात गोलंदाजी करताना युवराज सिंगनेही शानदार प्रदर्शन करत २ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशकडून नजीमुद्दीन आणि जावेद ओमारने सलामीला चांगली फलंदाजी केली. या दोघांनी सलामीला अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र प्रज्ञान ओझाने ओमारला बाद केले आणि इंडिया लिजंड्सला ब्रेक थ्रू मिळाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशवर वर्चस्व गाजवले.
युवराजने दोन फलंदाजांना केले त्रिफळाचीत
ओझाने ओमारला बाद केल्यानंतर लगेचच नजीमुद्दीनला युवराजने डावाच्या ९ व्या षटकात ४९ धावांवर त्रिफळाचीत केले आणि भारताला दुसरे यश मिळवून दिले. युवराजने पुढे ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हन्नाह सरकारलाही त्रिफळाचीत केले. युवराजने टाकलेला चेंडू सरकारला कळायच्या आतच आत घुसला आणि थेट मधला स्टंप उडला. त्याच्या या विकेट्सच्या व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. युवराजने या सामन्यात ३ षटकात १५ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
His 2nd wicket????????❤️❤️❤️
Yuvi the king❤️ https://t.co/zVIJowQTk9 pic.twitter.com/26uZvhouOz
— Wednesday addams! ???????? (@YuviReignsGirl) March 5, 2021
Wicket by @YUVSTRONG12 ????????#RoadSafetyWorldSeries2021 pic.twitter.com/ZGCz3xBzFd
— Yuvraj Singh World (@YuviWorld) March 5, 2021
Singh is King #YuvrajSingh ???????? #IndiaLegends @YUVSTRONG12@YuviWorld @TamilnaduD pic.twitter.com/0OCdzbli9B
— Srk Rajkumar (@RajYuviVj12) March 5, 2021
भारतीय गोलंदांनी बांगलादेशला १०९ धावांवर रोखले
इंडिया लिजंड्सच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करताना २० व्या षटकात बांगलादेश लिजंड्सला १०९ धावांवर सर्वबाद केले. बांगलादेशकडून नजीमुद्दीनने सर्वाधिक ४९ धावा केल्या. त्याच्याशिवाय केवळ ओमार आणि राजीन सालेह यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. या दोघांनी प्रत्येकी १२ धावा केल्या. इंडिया लिजंड्सकडून विनय कुमार, प्रज्ञान ओझा आणि युवराजने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर मनप्रती गोणी आणि युसूफ पठाणने प्रत्येकी १ विकेट घेतली.
सेहवागचे तुफानी अर्धशतक
बांगलादेशने दिलेल्या ११० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया लिजंड्सकडून विरेंद्र सेहवागने त्याच्याच शैलीत धडाकेबाज ३५ चेंडूत नाबाद ८० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ५ षटकार मारले. त्याला सलामीला सचिन तेंडुलकरने २६ चेंडूत ३३ धावांची खेळी करत साथ दिली. या दोघांनी १०.१ षटकातच भारताला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
भविष्यातील महान खेळाडू! पंतला मिळाली बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीकडून कौतुकाची थाप
पुन्हा एकदा ‘विरू के शोले’! ३५ चेंडूत खेळली ८० धावांची खेळी, इंडिया लिजेंड्सचा मोठा विजय
पंतने शतक पूर्ण करतात कौतुक करण्यासाठी बाल्कनीत पळत आला कर्णधार कोहली, पाहा व्हिडिओ