गुवाहाटी। भारत विरुद्ध श्रीलंका संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना बारसपारा स्टेडियम, गुवाहाटी येथे रविवारी(5 जानेवारी) होणार होता. मात्र या खेळपट्टीत ओलावा असल्याने सामना रद्द करण्यात आला.
या सामन्याआधी गुवाहाटीमध्ये जवळपास तासभर पाऊस पडला होता. मात्र काही रिपोर्ट्सच्या मते कव्हर्स फाटलेले असल्याने ते खेळपट्टीवरुन हटवताना पाणी खेळपट्टीवर पसरले. त्यामुळे ग्राउंड स्टाफने खेळपट्टी सुकवण्यासाठी 2 तास काम केले.
खेळपट्टी सुकवण्यासाठी सुपर सॉपरबरोबरच इस्त्री आणि हेअरड्रायरही वापरण्यात आले. त्यामुळे सध्या बीसीसीआयवर टीका होत आहे. चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे.
इस्त्री आणि हेअर ड्रायरने खेळपट्टी सुकवतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच पाकिस्तानच्या चाहत्यांनीही याबद्दल बीसीसीआयची हुर्या उडवली.
पाकिस्तानने 2018मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी संघातील सामन्यादरम्यान पावसामुळे ओली झालेली खेळपट्टी सुकवण्यासाठी आर्मी हॅलिकॉप्टरची मदत घेतली होती. याच गोष्टीचा संदर्भ देत चाहत्यांनी बीसीसीआयची चेष्टा केली आहे.
असे केले चाहत्यांनी बीसीसीआयला सोशल मीडियावर ट्रोल –
https://twitter.com/USAMAZAHID218/status/1213867781260816384
Pakistan using two helicopter's to DRY Qadaffi Stadium Lahore in PSL 3 and look what India is doing in Guhawati, using hair dryer to dry the pitch#BCCI #India #IndvSL #PSL5 #Guhawati #Pakistan pic.twitter.com/IWLtuRJtS4
— Najeeb ul Hasnain (@ImNajeebH) January 5, 2020
https://twitter.com/AsadAli512/status/1214039669584924674
#Pakistan using Helicopter to dry the Pitch#India Using Hair Dryers to Dry the Pitch 😂😂
Phuk #BCCI pic.twitter.com/nCVVfrcwHR
— ꪑꪊꫝꪖꪑꪑꪖᦔ ꪀꪖᦔꫀꫀꪑ🌾🥀🌱 (@PhytoDr_Alipur) January 6, 2020
जो विक्रम सचिनने भारतासाठी केला तोच विक्रम टेलरने न्यूझीलंडसाठी केला!
वाचा👉https://t.co/2tGbxUFMhj👈#म #मराठी #Cricket #AUSvNZ @RossLTaylor— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020
सामना झाला नाही पण भारतीय जुगाडाची झाली सगळीकडेच चर्चा
वाचा👉https://t.co/nlqu4bDWqG👈@BCCI #म #मराठी #Cricket #INDvSL— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020