महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित पहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL 2025) स्पर्धेला 5 जूनपासून गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर भव्य शुभारंभ होणार आहे. महिलांच्या टी-20 क्रिकेटला राज्यात नवे उभारी देणाऱ्या या स्पर्धेमुळे नवोदित खेळाडूंना आंतरराज्यीय व्यासपीठ मिळणार आहे. (Women’s Maharashtra Premier League 2025)
चार फ्रेंचायझी संघांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत सोलापूर स्मॅशर्स संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तेजल हसबनीस या संघाचे नेतृत्व करणार असून तिच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली सोलापूर संघ विजयी सलामी देण्यासाठी सज्ज झाला आहे. (WMPL TEAMS 2025)
स्पर्धेचे एकूण 12 लीग सामने 5 ते 13 जूनदरम्यान खेळवले जाणार असून अंतिम सामना 14 जून रोजी रंगणार आहे.
WMPL 2025 साठी सोलापूर स्मॅशर्सचे संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे (WMPL 2025: Full Schedule of Solapur Smashers team)
विरुद्ध पुणे वाॅरियर्स, 5 जून, सकाळी 9.30 वाजता
विरुद्ध रत्नागिरी जेट्स, 6 जून संध्याकाळी 7 वाजता
विरुद्ध रायगड राॅयल्स, 8 जून, सकाळी 9.30 वाजता
विरुद्ध रत्नागिरी जेट्स, 9 जून दुपारी 2 वाजता
विरुद्ध रायगड राॅयल्स, 11 जून, दुपारी 2 वाजता
विरुद्ध पुणे वाॅरियर्स, 12 जून, सकाळी 9.30 वाजता
महिला क्रिकेटच्या इतिहासात महाराष्ट्रात पहिल्यांदाच रंगणाऱ्या वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL 2025) स्पर्धेतील सर्व सामने गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर खेळवले जाणार असून, यामध्ये प्रेक्षकांसाठी खास आनंददायक निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात सर्व सामन्यांना मोफत प्रवेश असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिली. (Women’s Maharashtra Premier League 2025: Free Stadium Entry In Stadium)
थेट प्रक्षेपणाचीही सुविधा
ज्या प्रेक्षकांना मैदानावर येणं शक्य नाही, त्यांच्यासाठी सामन्यांचे थेट प्रक्षेपण JioCinema (JioHotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि Star Sports 2 या क्रीडा वाहिनीवर करण्यात येणार आहे. त्यामुळे घरबसल्या देखील ही स्पर्धा पाहता येणार असून, महिला क्रिकेटमधील नव्या उंचीचा अनुभव प्रत्येकाच्या हातात असणार आहे. (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioCinema)





