---Advertisement---

एक चुकी वेस्ट इंडिजला भोवली, तर अन्य ५ खास कारनामेही या कसोटीत पहायला मिळाले

On: बुधवार, जुलै 29, 2020 4:45 PM
---Advertisement---

८ जुलै रोजी साउथम्पटन येथील पराभवाने आपल्या कसोटी मालिकेची सुरुवात करणाऱ्या इंग्लंडने दमदार शेवट केला. मॅन्चेस्टर येथे काल (२८ जुलै) पार पडलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजला २६९ धावांनी पराभूत केले. आणि २-१ च्या फरकाने मालिका खिशात घातली.

इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ मात्र १९७ धावांवरच सर्वबाद झाला. त्यानंतर, इंग्लंडने त्यांच्या दूसऱ्या डावात २ विकेट्स गमावत २२६ धावांवर डाव घोषीत केला. वेस्ट इंडिज संघाचे फलंदाज त्यांच्या दूसऱ्या डावातही चांगले प्रदर्शन करु शकले नाहीत आणि फक्त १२९ धावांवर सर्वबाद झाले. अशाप्रकारे इंग्लंडने २६९ धावांच्या मोठ्या फरकाने मालिका खिशात घातली.

चला तर जाणून घेऊयात इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील कसोटी मालिकेविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी – Some IMP Things About ENG Vs WI Test Series

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने वेस्ट इंडिविरुद्द ९०.७५च्या सरासरीने एकूण ३६३ धावा केल्या. तसेच, ९ विकेट्सही घेतल्या. तरीही स्टोक्सला नव्हे तर स्टुअर्ट ब्रॉडला मालिकावीर निवडण्यात आले. स्टुअर्टने २ कसोटी सामन्यात एकूण १६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच एक अर्धशतकही ठोकले.

स्टुअर्ट ब्रॉडने मॅंचेस्टर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटची विकेट घेत आपल्या ५०० कसोटी विकेट्स पूर्ण केल्या आहेत. हा पराक्रम करणारा तो जगातील ७वा गोलंदाज ठरला आहे. तसेच, इंग्लंड संघातील सातवा खेळाडू आहे, ज्याने एका कसोटी सामन्यात १० विकेट्स चटकावल्या आणि सोबतच अर्धशतकही केले. शिवाय, स्टुअर्टने त्याच्या कारकिर्दीत ३वेळा एका कसोटी सामन्यात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

स्टुअर्ट हा इंग्लंडकडून कसोटी सामन्यातील चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत चौथ्या डावात ७९ विकेट्स घेतल्या आहेत. तर, जेम्स अंडरसन ७८ विकेट्ससह दूसऱ्या क्रमांकावर येतो.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी मिळून ५० विकेट्स घेतल्या आहेत. १९१२नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडच्या गोलंदाजांनी ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत विकेट्सचे अर्धशतक केले आहे.

इंग्लंड संघाने आतापर्यंत ५वेळा पहिला कसोटी सामना पराभूत झाल्यानंतरही ३ सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आहे. हा कारनामा त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ वेळा, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी १-१ वेळा केला आहे.
मॅंचेस्टर मैदानावर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची चुकी केली. कारण, आतापर्यंत या मैदानावर नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणारा कोणताही संघ जिंकू शकलेला नाही. या मैदानावर आतापर्यंत १०वेळा नाणेफेक जिंकल्यानंतर संघांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यापैकी ३ सामने संघाने गमावले आहेत. तर, ७ सामने अनिर्णीत राहिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---