इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केन आणि दक्षिण कोरियाचा फुटबॉलपटू सोन हियूंग मिन जोडीने पुन्हा एकदा त्यांचा करिश्मा दाखवला आहे. टोटेनहैम विरुद्ध ब्रुनले संघात झालेल्या इंग्लिश प्रीमियर लीगच्या (ईपीएल) सामन्यात सोनने (७६व्या मिनिटाला) केनच्या फ्लिकवर गोल केला. ईपीएलच्या या हंगामात या जोडीने केलेला हा ९वा गोल होता. यामुळे टोटेनहैमने ब्रुनलेवर १-०ने विजय मिळवला.
सोनने आठ वेळा केला आहे गोल
ईपीएलच्या या हंगामात कोरियन फुटबॉलपटू सोनने (Son Heung-min) आतापर्यंत ८वेळा गोल केला आहे. यासह तो सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर इंग्लंडचा फुटबॉलपटू केनने (५ गोल, ८ मध्ये मदत) एकूण १३ गोल केले आहेत. हे त्यांची ईपीएलच्या या हंगामातील मागील ६ सामन्यांची आकडेवारी आहे.
सोन-केनच्या जोडीचा हा २९वा गोल
ईपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सोन आणि केन (Harry Kane) या जोडीने मिळून केलेला हा २९वा गोल होता. त्यांच्यापुर्वी फ्रॅंक लेपार्ड आणि डिडियर ड्रोग्बा या जोडीने मिळून ईपीलच्या इतिहासात सर्वाधिक ३६वेळा गोल केला आहे. सोन-केनची जोडी लेपार्ड आणि ड्रोग्बा या जोडीचा सर्वाधिकवेळा गोल करण्याच्या विक्रमापासून केवळ ७ पाऊले दूर आहे. येत्या काही सामन्यात ही जोडी हा विक्रम मोडेल का नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गज फुटबॉलपटूला कोरोनाची लागण; सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
शेवटी ठरलं ! ‘या’ तारखेला होणारा आयएसएलचा शुभारंभ
शंभर वर्ष जुन्या क्लबने बदलले नाव आणि लोगो; ‘या’ नावाने सहभागी होणार आयएसएलमध्ये
भारतीय संघाचा ‘स्टार स्ट्रायकर’ मुंबई सिटी एफसीकडे ; प्रशिक्षक लोबेरो यांनी केली घोषणा