भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा पिता बनला आहे. त्याची पत्नी सोनम भट्टाचार्य हिने बुधवारी (30 ऑगस्ट) उशिरा मुलाला जन्म दिला. यानंतर सर्व स्तरातून सुनील याचे अभिनंदन केले जात आहे.
कोलकाता येथील एका स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी उशिरा सुनील छेत्री याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. मुल आणि आई अशा दोघांची देखील प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. छेत्रीने जून महिन्यात इंटर कॉन्टिनेन्टल कपवेळी आपण पिता बनणार असल्याचे सांगितले होते. वनातू विरुद्धच्या सामन्यावेळी त्याने खास गोल सेलिब्रेशन केलेले.
सध्या छेत्री त्याच्या कुटुंबासोबत असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी त्याने डुरंड कपमधून माघार घेतलेली. तसेच, भारतीय संघासोबत तो सध्या थायलंड येथे सुरू असलेल्या किंग्स कपमध्ये सहभागी झालेला नाही. भारतीय संघाचे प्रशिक्षण इगॉर स्टीमॅक यांनी त्याला या स्पर्धेसाठी अनुपलब्ध राहण्याची परवानगी दिली होती.
(Sonam Bhattacharya and Sunil Chhetri are blessed with a baby boy, both mother and child are healthy and fine)
हेही वाचाच-
‘हे थोडे कठीण…’, रक्षाबंधनच्या खास क्षणी हळहळली शुबमनची बहीण; तुम्हीही व्हाल भावूक
भारताचा माजी खेळाडू बाबरच्या शतकावर फिदा; म्हणाला, ‘त्याची फलंदाजी डोळ्यांना सुखावणारी…’