---Advertisement---

मोठ्या मनाचा खेळाडू! सीएसकेच्या ‘या’ खेळाडूने केलेल्या मदतीबद्दल सोनू सूदने मानले आभार

On: बुधवार, मे 19, 2021 12:06 PM
---Advertisement---

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दिवसाला हजारो लोक आपले प्राण गमवत आहेत. या कठीण काळात प्रत्येकाला सहकार्याची गरज आहे. त्यामुळे बॉलिवुड अभिनेता सोनू सुद याने, कोरोनाच्या कठीण काळात अनेकांना मदत केली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांचा देखील समावेश आहे. सोनू सूद करत असलेल्या समाज कार्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या फिरकी गोलंदाजांनेही हातभार लावला होता. आता त्याचे सोनू सूदने ट्विट करत आभार मानले आहेत.

कोरोनाच्या या कठीण काळात अनेक क्रिकेटपटू देखील पुढे येऊन मदत करत आहेत. अशातच चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फिरकी गोलंदाज कर्ण शर्मा याने सोनू सूद करत असलेल्या समाजकार्यात हातभार लावला होता. त्याने सोनू सूद फाऊंडेशनला अनेक माध्यमातून मदत केली होती. याची दखल घेत सोनू सूदने ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत. त्याने आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, “सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनला मदत केल्याबद्दल माझा भाऊ कर्ण शर्मा याचे मनापासून आभार. तुम्ही पुन्हा एकदा तरुणांसाठी प्रेरणा म्हणून पुढे आले आहात आणि तुमच्यासारख्या लोकांमुळे हे विश्व एक भव्य आणि शांत ठिकाण बनले आहे.”

सोनू सूदने केलेल्या या ट्विटला प्रतिसाद देत कर्ण शर्माने लिहिले की,” आपण आमच्या देशाचे खरे नायक आहात. तुम्ही खूप कौतुकास्पद काम करत आहात. मी तुमच्यापुढे नतमस्तक आहे आणि तुम्ही असेच कार्य करत राहा.”

कर्ण शर्मा हा आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतो. तो आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील चेन्नई सुपर किंग्ज संघात होता. परंतु त्याला या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल स्पर्धेत देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत २९ सामने खेळवले गेले आहेत. उर्वरित ३१ सामने केव्हा खेळवण्यात येतील याबाबत कुठलीही माहिती दिली गेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय संघाला मिळाला मोठा दिलासा, इंग्लंड दौऱ्यापूर्वी संघातील ‘हे’ तीन खेळाडू पूर्णपणे फिट

दुःखाचा डोंगर कोसळलेल्या वेदा कृष्णमूर्तीला बीसीसीआयकडून सांत्वना; माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केली होती टीका

मानाच्या ऍशेस मालिकेला ‘या’ दिवशी होणार सुरुवात; २६ वर्षांनंतर पहिल्यांदाच पर्थमध्ये होणार अखेरचा सामना 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---