पुणे, २२ सप्टेंबर २०२३ – अंतिम पंघलने गुरुवारी जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारी अंतिम ही सर्वात तरुण खेळाडू ठरली. या कामगिरीने अंतिमने पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्रता सिद्ध केली आहे.
कुमार गटापासून प्रभावी कामगिरी करणाऱ्या अंतिमला लक्ष्य स्पोर्ट्स आणि एडेलगिव्ह फाऊंडेशनद्वारे आर्थिक सहकार्य मिळाले आहे. विशेष म्हणजे कुमार गटात अंतिमने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करून दाखवली आहे. जागतिक स्पर्धेत गतविजेती ऑलिव्हिया पेरिशचा पराभव करून अंतिमने आपली प्रतिभा दाखवून दिली होती. मात्र, पुढे उपांत्य फेरीत अंतिमला हार पत्करावी लागली. मात्र, कांस्यपदकाच्या लढतीत १९ वर्षीय अंतिमने स्वीडनच्या युरोपियन चॅम्पियन एम्मा जोना डेनिस माल्मग्रेनचा पराभव केला.या कामगिरीने अंतिम पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली कुस्तीगीर ठरली आहे.
लक्ष्य स्पोर्ट्स, पुण्यातील राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध स्पोर्ट्स एनजीओ आणि मुंबईस्थित एडलगिव्ह फाऊंडेशनने अंतिमला तिच्या संपूर्ण प्रवासात सर्वसमावेशक सहकार्य केले. अंतिम आता आशियाई क्रीडा स्पर्धेतही सहभागी होणार असल्यामुळे जागतिक स्पर्धेतील पदक तिच्यासाठी मनोबल उंचावणारे ठरले आहे. आशियाई स्पर्धेत लक्ष्यचे सहकार्य लाभलेले चार खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये टेबल टेनिसपटू शरथ कमल, बुद्धिबळपटू जीएम विदित गुजराथी, कुस्तीपटू अंतिम पांगल आणि सुनील कुमार यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत भारतीय संघ टेबल टेनिस संघ सर्वोत्तम कामगिरी करून अंचता शरथ कमालला भावपूर्ण निरोप देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. “गेल्या ३ वर्षापासून अंतिम पंघालच्या प्रवासाचा भाग बनल्याचा आम्हांला आनंद वाटतो आणि जागतिक स्पर्धेतील तिच्या यशाचा अभिमान वाटतो. आम्हाला आशा आहे की विदित गुजराथी, अंतीम पांगल आणि सुनील कुमार जे या स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याची क्षमता असलेले प्रबळ दावेदार आहेत आणि त्यांच्या कामगिरीने भारताचा झेंडा अभिमानाने फडकावतील.” असे लक्ष्यचे अध्यक्ष सत्येन पटेल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: 2024 टी20 वर्ल्डकपच्या तारखा घोषित, तब्बल 10 शहरात रंगणार स्पर्धा
गिल-ऋतुराजच्या धमाक्यानंतर ऑस्ट्रेलियाचे कमबॅक! श्रेयस पुन्हा अपयशी, झम्पा चमकला