---Advertisement---

दिल मिल गये! गांगुली-विराटने सामन्यानंतर केला हॅंडशेक, वादावर पडला पडदा

On: रविवार, मे 7, 2023 10:15 AM
---Advertisement---

आयपीएलच्या 16व्या हंगामात शनिवारी (6 मे) दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिल्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने 7 विकेट्सने आरसीबीला पराभूत केले. दिल्लीने काहीच एकतर्फे झालेल्या या सामन्यात विजय संपादन केला असला तरी, सामन्यानंतर घडलेल्या एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दिल्लीने विजयासाठी मिळालेले मोठे लक्ष आरामात पार करत आपला चौथा विजय नोंदवला. हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघ हस्तांदोलन करत असताना एक लक्षवेधी घटना घडली. आरसीबीचा वरिष्ठ खेळाडू विराट कोहली व दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट हेड सौरव गांगुली हे हस्तांदोलन करताना दिसून आले. उभय संघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात या दोन्ही दिग्गजांनी हस्तांदोलन करण्याचे टाळले होते. त्यानंतर या दोघांमधील वाद मिटला नसल्याचे म्हटले जात होते.

विराट व गांगुली यांच्यामध्ये वाद असल्याचे विराटने 2021 मध्ये टी20 संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर समोर आले होते. या दोघांनी विरोधी वक्तव्य केल्याने, या वादाची ठिणगी पडली होती. विराटने कर्णधार पदाचा राजीनामा देताना कोणतीही चर्चा केली नसल्याचे, गांगुली यांनी त्यावेळी म्हटले होते. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष असलेल्या गांगुली यांच्या या विधानावर विराटने प्रतिक्रिया देताना आपण चर्चा केल्याचे म्हटलेले. त्यानंतर अनेकदा हे दोघे समोर आल्यानंतरही एकमेकाला टाळताना दिसलेले.

या सामन्याचा विचार केल्यास आरसीबीने विराट कोहली व महिपाल लोमरोर यांच्या अर्धशतकांमुळे निर्धारित 20 षटकांमध्ये 4 बाद 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 16.4 षटकांमध्ये 182 धावांचे लक्ष्य गाठले. दिल्लीचा सलामीवीर फिल साल्ट मॅच विनर ठरला. सॉल्टने 45 चेंडूत 87 धावा केल्या. दिल्लीचा हा चौथा विजय असून, त्यांना प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरित सर्व चार सामने जिंकावे लागतील.

(Sourav Ganguly And Virat Kohli Shakehand After Delhi Capitals RCB Match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात आरसीबीचा पुन्हा राडा! वॉर्नर आणि सॉल्टशी भिडला सिराज
50- 50 आणि 50! विराटने जुळवला ‘हा’ अनोखा योगायोग, वाचून तुम्हीही कराल कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---