भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डावर निवड झाली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने प्राधान्याने एका बैठकीचे आयोजन केले होते. यात गांगुलीने काॅन्फरन्स काॅलने सहभाग नोंदवला.
या बैठकीत क्रिकेटच्या भवितव्याबाबत गहण चर्चा करण्यात आली. तसेच कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटचे जे नुकसान होत आहे त्याची भविष्यात भरपाई कशी करता येईल याबद्दल चर्चा करण्यात आली. (Sourav Ganguly becomes first-ever BCCI representative on ICC Board.)
एकाद्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने प्रथमच अशा बैठकीचे आयोजन केले होते.
गांगुलीने याच आठवड्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५० लाख रुपयांचे तांदूळ गरिब लोकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. तसेच तो ज्या संघटनेवर अनेक वर्ष काम करत होता त्या बंगाल क्रिकेट संघटनेने २५ लाख रुपये कोरोना विरुद्धच्या लढाईत दिले आहे. तसेच बंगालकडून क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंचा विमाही काढला आहे.
ट्रेडिंग घडामोडी-
–जर आयपीएल झाली नाही तर या ३ खेळाडूंचा विश्वचषकातील पत्ता होणार कट
एकाच दिवशी पदार्पण केलेल्या जोड्या, एकाने केले पुढे मोठे नाव तर दुसरा राहिला खूपच मागे
चौथ्या क्रमांकासाठी भारताकडे आहेत तब्बल १२ पर्याय उपलब्ध, ३ नावं आहेत मराठी
आयपीएलमध्ये चेन्नईला हा संघ कायमच नडतो, तब्बल १७ पराभव आलेत सीएसकेच्या नशीबात