---Advertisement---

जेव्हा सौरव गांगुली होतो स्वत:च्याच मुलीकडून ट्रोल…

On: मंगळवार, नोव्हेंबर 26, 2019 1:10 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध बांगलादेश संघात इडन गार्डन, कोलकाता येथे झालेला दिवस-रात्र कसोटी सामना रविवारी संपला. या सामन्यात भारताने 1 डाव 46 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोवर त्याच्याच मुलीने त्याला ट्रोल केले आहे.

गांगुलीने या सामन्यानंतर प्रेझेंटेशन दरम्यानचा त्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत होते. त्याच्या याच फोटोवर त्याची मुलगी सनाने ‘असे काय आहे जे तूम्हाला आवडत नाही?’, अशी प्रतिक्रिया दिली.

यावर गांगुलीने तिला उत्तर दिले की ‘तू आता आज्ञा पाळत नाहीत.’ गांगुलीच्या या उत्तरावर सनानेही गमतीशीर उत्तर दिले. तीने लिहिले की ‘तूमच्याकडूनच हे शिकत आहे.’

Screengrab: Instagram/SOURAV GANGULY

47 वर्षीय गांगुली मागील महिन्यात बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला आहे. तसेच हे पद स्विकारल्यानंतर गांगुलीने भारतात दिवस-रात्र कसोटी सामना आयोजित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती.

https://www.instagram.com/p/B5QCRbEA_xO/

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---