विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील काढून घेण्यात आले. विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर अनेक विवाद झाले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी यासंदर्भात महत्वाची प्रतिक्रिया दिली होती. आता भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर (Dilip Veganskar) यांनी गांगुलींनी दिलेल्या या प्रतिक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
वेंगसरकर यांच्या मते गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि कर्णधारपदावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाहीय. कर्णधारपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवड समितीचा आहे.
वेंगसरकर पीटीआयसोबत बोलताना म्हणाले की, “निवड समितीच्या दृष्टीने गांगुलींच्या बोलण्याचा काहीच अर्थ नव्हता. ते बीसीसीआय अध्यक्ष आहेत. संघनिवड किंवा कर्णधारपदावर निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी बोलले पाहिजे होते.” ते पुढे म्हणाले, “कर्णधाराला निवडणे किंवा हटवणे निवड समितीचा निर्णय आहे. गांगुलीच्या कार्यक्षेत्रात हे येत नाही.”
अधिक वाचा – धोनीच्या बाबतीत जे पहिल्या सामन्यात झालं तेच शेवटच्याही!
तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषकातील भारताचे अभियान संपल्यानंतर विराट कोहलीने स्वतःच्या इच्छेने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर बीसीसीआयने संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी ८ डिसेंबरला विराटच्या ऐवजी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले गेले.
व्हिडिओ पाहा – जगातील कोणत्याही फलंदाजाला १० प्रकारे तुम्ही करु शकता बाद
रोहितला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवल्यानंतर सौरव गांगुलींनी याबाबत स्पष्टीरकण दिले होते. त्यांनी म्हटले होते की, टी२० आणि एकदिवसीय संघ एकाच खेळाडूच्या नेतृत्वात असल्यास योग्य ठरते.
तसेच त्यांनी स्वतः विराटला टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नको, असा सल्ला दिल्याचेही गांगुलींनी सांगितले होते. परंतु, त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, टी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना कोणीच त्याच्याशी चर्चा केली नव्हती. तसेच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याच्या काही तास आधी त्याला या गोष्टीची माहिती देण्यात आली होती.
विराट आणि गांगुलीच्या दोन विरोधी विधानांमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते.
महत्वाच्या बातम्या –
सेंच्युरियन कसोटीत रिषभ पूर्ण करणार सर्वात वेगवान शतक? धोनीला टाकणार मागे?
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या ४ गोष्टी