भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून वर्णन केले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहलीने शतक झळकावले होते. पण पुढील सात डावांमध्ये तो फक्त 85 धावाच करू शकला. कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा सारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारताला ऑस्ट्रेलियात 1-3 अशी मालिका गमवावी लागली.
बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने राज्यातील खेळाडूंच्या सत्कार समारंभात गांगुली म्हणाला की, विराट कोहलीसारखे क्रिकेटपटू क्वचितच जन्माला येतात. त्याच्या कारकिर्दीत 81 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणे हे अविश्वसनीय आहे. माझ्यासाठी तो कदाचित जगातील सर्वात महान व्हाईट बॉल खेळाडू आहे.
पर्थमधील शतकानंतर कोहलीच्या संघर्षाबद्दल गांगुली म्हणाला की, मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये तो शतक करू शकला नाही याचे त्यालाही आश्चर्य वाटले. पर्थमध्ये शतक झळकावल्यानंतर त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहून तो खरोखरच आश्चर्यचकित झाला, असे गांगुलीने सांगितले. याआधी त्याला संघर्ष करावा लागला होता. पण पर्थमध्ये शतक केल्यानंतर त्याला वाटले की ही त्याच्यासाठी एक मोठी मालिका असेल.
Sourav Ganguly said – “I feel There is a lot of Cricket and runs left in Virat Kohli”. (RevSportz). pic.twitter.com/jF0RRP79hQ
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 21, 2025
पुढे बोलताना गांगुलीने विराटवर आत्मविश्वास व्यक्त करत म्हणाला, “चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतेल. विराटमध्ये आणखी खूप क्रिकेट शिल्लक आहे. इंग्लंड दौरा त्याच्यासाठी एक मोठे आव्हान असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील त्याच्या फॉर्मबद्दल मला फारशी चिंता नाही कारण तो कदाचित पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे.”
हेही वाचा-
नाशिकमध्ये क्रिकेटचा मोठा सामना, भारतीय क्रिकेटर दिसणार ॲक्शनमध्ये
रिंकू सिंगने पुन्हा मन जिंकले, वडिलांना दिला खास भेट, सोशल मीडियावर वाह.! वाह..!!
आखेर 12 वर्षांनंतर विराट कोहली रणजी ट्राॅफीत खेळणार, मुख्य प्रशिक्षकांनी केली पुष्टी