आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघातील खेळाडूंची नावे सोमवारी जाहीर होणार आहेत. यानंतर भारती ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय निवडकांकडून संघनिवड सोपी होणार नाही. विशेषतः केएल राहुलच्या पुनरागमनानंतर. सध्या ईशान किशनने यष्टिरक्षक म्हणून चांगली कामगिरी केली. परंतु, केएल राहुल आणि ईशान यांच्यात निवडकर्ते कोणाकडे लक्ष देतील? विश्वचषकासाठी सर्वोत्तम पर्याय कोण आहे? मात्र, या प्रश्नाचे उत्तर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिले आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) विश्वचषकासाठी केएल राहुल (KL Rahul) पेक्षा ईशान किशन (Ishan Kishan) ला चांगला पर्याय मानतो. ईशान ज्याप्रकारे आक्रमक फलंदाजी करतो, ती माझी पहिली पसंती असेल. असे सौरव गांगुलीचे मत आहे. तो म्हणाला की, “ऋषभ पंत हा आमचा सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज आहे. मात्र, तो सध्या तंदुरुस्त नाही. आमच्याकडे ईशान किशन आणि केएल राहुल हे 2 सर्वोत्तम पर्याय आहेत.”
तसेच गांगुली म्हणाला की, “मला ईशान किशनला स्थान मिळावे असे वाटते, तो कोणत्याही संघासाठी सलामीवीर म्हणून खेळू शकतो. मात्र, मला खात्री आहे की राहुल द्रविडकडे नक्कीच सर्वोत्तम योजना असेल.” असेही गांगुली म्हणाला.
ईशान किशन विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे.
विशेष म्हणजे केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून मैदानावर दिसलेला नाही. त्याचबरोबर वेस्ट इंडिज दौऱ्यावर ईशानने आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले. वेस्ट इंडिजमध्ये ईशानने सलग धावा केल्या. याच कारणामुळे तो हा यष्टिरक्षक म्हणून आशिया चषक आणि आगामी विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, भारतीय निवड समिती कोणत्या खेळाडूची निवड करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (sourav ganguly on kl rahul and ishan kishan)
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक आयर्लंडच्या पारड्यात, भारता ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह करणार प्रथम…
‘रोहित आणि विराट यांचा टी20 न खेळण्याचा निर्णय अगदी योग्य’, अश्विनचे मोठे वक्तव्य