---Advertisement---

IND vs NZ: फायनलमध्ये कोण मारणार बाजी? माजी कर्णधाराची मोठी भविष्यवाणी

On: शनिवार, मार्च 8, 2025 9:22 PM
---Advertisement---

उद्या (9 मार्च) आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलचा थरार रंगणार आहे. दरम्यान यासाठी भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने-सामने आहेत. दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज असतील. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे. अशातच न्यूझीलंडविरुद्ध भारत एक मजबूत दावेदार आहे आणि भारत जिंकेल, असे मत माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) व्यक्त केले.

रविवारी भारत आणि न्यूझीलंड संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने असतील. या सामन्यात भारताच्या विजयाबद्दल गांगुली आत्मविश्वासू आहे. सौरव गांगुलीने पत्रकारांना सांगितले की, “जो चांगला खेळेल तोच ट्रॉफी जिंकेल.” विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मोठे खेळाडू म्हणत गांगुली म्हणाला की, “भारताचा विजय त्यांच्यावर अवलंबून असेल. भारतीय संघात शुबमन गिल, विराट, श्रेयस अय्यर, रोहित आणि केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि भारताच्या विजयात ते महत्त्वाची भूमिका बजावतील.”

गांगुली म्हणाला की, “भारताने 2023 च्या विश्वचषकाचा फायनल सामना खेळला, 2024 मध्ये टी20 विश्वचषक जिंकला आणि आतापर्यंत या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अपराजित आहे, त्यामुळे माझ्या मते भारत एक दावेदार आहे. पण जो संघ चांगला खेळेल तो जिंकेल. न्यूझीलंड संघाची फलंदाजी चांगली आहे पण भारतीय गोलंदाजीही तितकीच मजबूत आहे.”

भारत-न्यूझीलंड संघाच्या वनडे क्रिकेटमधील हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघ 119 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारताचे वर्चस्व राहिले. भारताने 61 सामन्यात मिळवला, तर न्यूझीलंडने 50 सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान भारताने 50 सामने गमावले, तर न्यूझीलंडला 61 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघातील 7 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 1 सामना बरोबरीत सुटला. (India vs New Zealand Head to Head Records In ODI)

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs NZ: फायनलनंतर रोहित-विराट होणार निवृत्त? उपकर्णधाराचा मोठा खुलासा
IND vs NZ Final: “नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार..” विश्वचषक विजेत्या प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य
इरफान पठाणचा सल्ला: अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या ‘या’ दोन खेळाडूंवर खास लक्ष द्या!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---